Advertisement

दिलासादायक! कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण ९३ टक्क्यांवर


दिलासादायक! कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण ९३ टक्क्यांवर
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण ९३ टक्क्यांवर स्थिर आहे. ही बाब काहीशी दिलासा देणारी ठरत आहे. मुंबईतील १,००८ जण सोमवारी बाधित झाले, तर ४ रुग्णांचा मृत्यू झाला.

कोरोना झालेल्यांची संख्या ३ लाख ३४ हजार ५७२ वर पोहोचली आहे. तर ११ हजार ५०४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मुंबईतील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले ९५६ रुग्ण सोमवारी कोरोनामुक्त झाले असून एकूण ३ लाख ११ हजार ४०७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. विविध रुग्णालयांमध्ये १० हजार ७७९ कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.

मुंबईमधील कोरोना वाढीचा दर ०.३१ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रुग्ण दुप्पटीचा काळ रविवारी सरासरी २३१ दिवस होता. तो कमी होऊन सोमवारी सरासरी २२५ दिवसांवर आला आहे. दिवसभरात १७ हजार ८४९ चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत तब्बल ३४ लाख ३४ हजार ६१० चाचण्या करण्यात आल्या.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा