Advertisement

रेमडेसिवीर इंजेक्शनची माहिती मिळणार एका कॉलवर

कोरोनावर दिलासादायक असलेले रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याचं समोर आलं आहे. इंजेक्शन सहज उपलब्ध व्हावे यासाठी हेल्पलाईन सुरु करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रशासनाला दिले आहेत.

रेमडेसिवीर इंजेक्शनची माहिती मिळणार एका कॉलवर
SHARES

कोरोनावर दिलासादायक असलेले रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत असल्याचं समोर आलं आहे. इंजेक्शन सहज उपलब्ध व्हावे यासाठी हेल्पलाईन सुरु करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शनची माहिती एका कॉलवर उपलब्ध होईल.

याशिवाय ऑक्सिजनपुरवठा नियंत्रण कक्षाच्या टोल-फ्री क्रमांकावरही संपर्क साधल्यास इंजेक्शन सहज उपलब्ध व्हावे यासाठी हेल्पलाईन सुरु करण्याचे निर्देश अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रशासनाला दिले आहेत. त्यामुळे ऑक्सिजन पुरवठा नियंत्रण कक्षाच्या टोल–फ्री क्रमांक १८००२२२३६५ वर मागणी व त्याची पूर्ततेसंदर्भातील माहिती आता रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना उपलब्ध होणार आहे.

राज्यातील रेमडेसिवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजन पुरवठ्याबाबत अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सचिव सौरव विजय एफडीए आयुक्त अरुण उन्हाळे, दक्षता विभागाचे सहआयुक्त सुनील भारद्वाज आणि उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी आणि वितरक उपस्थित होते.


या बैठकीमध्ये इंजेक्शनचा तुटवडा होऊ नये यासाठी महाराष्ट्राला रेमडेसिवीर इंजेक्शनचा जास्तीत जास्त साठा उपलब्ध करावा, दुर्गम भागामध्ये रुग्णांसाठी सहज औषधे उपलब्ध होतील, त्यादृष्टिकोनातून वितरणव्यवस्था राबवण्यात यावी, असे निर्देश शिंगणे यांनी उत्पादक कंपन्यांना दिले. त्याचबरोबर रेमडेसिवीर इंजेक्शन कुठे किती प्रमाणात उपलब्ध आहे, त्याची किंमत किती आहे, याची माहिती रुग्णांना व नागरिकांना सहज उपलब्ध व्हावी यासाठी हेल्पलाईन क्रमांक किंवा पोर्टल सुरु करण्याचे निर्देश शिंगणे यांनी प्रशासनाला दिले.

हेल्पलाईन सुरु झाल्यावर रुग्णांना इंजेक्शन माहिती सहज उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. राज्यामध्ये सध्या १५७७९ इंजेक्शन उपलब्ध असून 30 सप्टेंबरपर्यंत सुमारे १.५० लाख  इंजेक्शन उपलब्ध होतील अशी माहिती यावेळी उत्पादक व त्यांच्या वितरकांनी दिली. रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शन तात्काळ उपलब्ध व्हावा यासाठी एफडीएच्या मुंबईतील मुख्यालयातील ऑक्सिजन पुरवठ्याबाबत कार्यरत नियंत्रण कक्षामधून रेमडेसिवीर इंजेक्शनची माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत.


हेही वाचा -

कोरोना लशीच्या मानवी चाचणीला केईम रुग्णालयात सुरुवात

नाकावाटेही दिली जाऊ शकते कोरोना लस, सीरमकडून ट्रायलला सुरुवात



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा