Advertisement

आता घरातल्या घरात होऊ शकते COVID 19ची चाचणी

कंपनीचा दावा आहे की, या चायनीज किटपेक्षा खूप कमी किमतीत टेस्ट किट उपलब्ध करून देऊ शकतात. एका टेस्टला ५० ते १०० रुपये एवढाच खर्च येणार आहे.

आता घरातल्या घरात होऊ शकते COVID 19ची चाचणी
SHARES

घरातल्या घरात सामान्य माणसाला स्वतःची COVID-19 ची चाचणी करणं लवकरच शक्य होऊ शकतं. हॉस्पिटलमध्ये न जाता Coronavirus आहे की नाही याची शहानिशा करण्यासाठी उपयुक्त अशा टेस्ट किट हैदराबाद इथल्या एखा लॅबनं शोधून काढल्या आहेत. सध्या आपण वापरत असलेल्या चीनमधून आलेल्या टेस्ट किटच्या तुलनेत या देसी टेस्ट किटची किंमत अगदीच किफायतशीर असेल.

जिनोमिक्स बायोटेक या हैदराबादच्या कंपनीनं या टेस्टिंग किट्सची निर्मिती केली आहे. सध्या रॅपिड टेस्टिंगसाठी वापरण्यात आलेल्या टेस्ट किट चीनमधून मागवण्यात आल्या होत्या. त्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेल्यानंतर त्यांचा वापर काही ठिकाणी थांबवण्यातही आला होता. प्रत्येक टेस्टसाठी ६०० रुपयांपर्यंत खर्च या इम्पोर्टेड किटमुळे येत होता.

हैदराबादच्या कंपनीचा दावा आहे की, या चायनीज किटपेक्षा खूप कमी किमतीत टेस्ट किट उपलब्ध करून देऊ शकतात. एका टेस्टला ५० ते १०० रुपये एवढाच खर्च येणार आहे.

या किट मान्यतेसाठी पुढच्याच आठवड्यात ICMR कडे पाठवण्यात येणार आहेत. "मोठ्या प्रमाणावर लोकांची चाचणी करण्यासाठी रॅपिड टेस्ट किट वापरण्यात येते. या अँटिबॉडी टेस्टिंगसाठी या किटचा उपयोग होईल," असं प्रा. पी. रत्नगिरी म्हणाले. ते जिनोमिक्स बायोटेकचे संस्थापक आहेत. ही चाचणी करण्याची पद्धत अगदी सोपी आहे आणि सामान्य माणसालाही ती करता येऊ शकते. शिवाय अहवालात चूक होण्याची शक्यता फक्त ४ टक्के असू शकते."


रॅपिड टेस्टिंग किट म्हणजे?

यात व्यक्तीच्या शरीरातल्या अँटिबॉडीज तपासल्या जातात. कोरोना विषाणूची सध्या केली जाणारी पारंपरिक Real-Time Polymerase Chain Reaction (RT-PCR) पद्धतीची चाचणी महागडी आणि वेळखाऊ आहे. त्यामुळे लक्षणं न दिसणाऱ्या रुग्णांची कोरोना चाचणी आपल्या देशात न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाचा सगळ्यात मोठा धोका म्हणजे लक्षण न दिसणारे कोरोना वाहक आहे. त्यामुळे अशा पद्धतीने झटपट होणारी स्वस्त प्राथमिक चाचणी संपूर्ण समुदायाचीच केली, तर कोरोनाचा धोका असणाऱ्या माणसांना वेळीच वेगळं करता येईल.


कशी होणार चाचणी?

ही रक्तचाचणी असेल. शरीरातल्या अँटीबॉडीजची तपासणी करेल. कोरोनासारखा घातक विषाणू शरीरात शिरला की शरीराची प्रतिकारशक्ती त्याच्या लढण्यासाठी अँटीबॉडीज निर्माण करते. त्या अँटीबॉडीजच्या प्रमाणावरून शरीरात कोरोनाविषाणू आहे का याचा अंदाज बांधता येतो. लक्षणं नसतानासुद्धा शरीर या विषाणूचा सामना करत असतं. त्यामुळे लक्षण नसणारे कोरोनारुग्ण या रॅपिड टेस्ट किटमधून शोधणं सोपं जातं.


कशी असेल किट?

टेस्ट किट म्हणजे एक छोटा पाउच येतो. त्यामध्ये प्लास्टिकची एक टेस्ट प्लेट असते. प्रेग्नन्सी टेस्टिंग किटसारखीच याची रचना असेल. त्या प्लॅस्टिक पॅनेलवर पाऱ्यासारखी लाईन येईल. तीच तुमच्या चाचणीचा निकाल देईल. या पाऊचमध्ये कंपनी ग्लोव्हज आणि सुईसुद्धा देणार आहे. सुई टोचून रक्ताचा नमुना ड्रॉपरने प्लास्टिक प्लेटवर ठेवायचा, एवढंच काम करायचं आहे.



हेही वाचा

मृतदेहांशेजारी कोरोना रुग्णावर उपचार, सायन रुग्णालय प्रशासनाने दिले चौकशीचे आदेश

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा