Advertisement

मुंबईमध्ये कोरोना वाढतोय, मात्र मृत्युदरातील घट कायम


मुंबईमध्ये कोरोना वाढतोय, मात्र मृत्युदरातील घट कायम
SHARES

मुंबईसह आसपासच्या परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दररोज १ हजाराहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची भर पडत आहे. मात्र असं असलं तरी मृत्युदरातील घट कायम आहे. मुंबईचा मृत्युदर साडेतीन टक्क्यांपेक्षाही खाली असून आठवड्याचा मृत्युदर ०.४१ टक्क्यांपर्यंत घसरला असल्याची माहिती समोर येत आहे.

१ फेब्रुवारीपासून पुन्हा मुंबईत रुग्णसंख्या वाढत असून आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा दरदिवशी सरासरी १ हजार रुग्ण नव्याने नोंदले गेले. परंतु मृत्युदरात घट झाल्याचे दिसत आहे. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ३.६४ टक्क्यांवर असलेला मृत्युदर मार्चच्या पहिल्या आठवडय़ात ३.४६ पर्यंत कमी झाला आहे.

राज्याचा मृत्युदर वाढत आहे. मुंबईतील रुग्णसंख्या वाढत असूनही मृत्युदर वाढलेला नाही. उपचार देण्याबाबत डॉक्टरांना आलेल्या अनुभवामुळे सहव्याधी किंवा कृत्रिम श्वसनयंत्रणेवरील रुग्णही बरे होत आहेत.

रुग्णांचे प्रमाण ५ टक्केच

मुंबईत कोरोनाने थैमान घातले होते, त्यावेळी बाधितांचे प्रमाण चाचण्यांच्या तुलनेत २० टक्के होते. गेल्या काही दिवसांत पुन्हा रुग्ण वाढल्याचे दिसून येते. मात्र तरीही बाधितांचे प्रमाण ५ टक्क्यांहून अधिक वाढले नसल्याने त्या तुलनेत संसर्ग प्रसार वाढला आहे, असे म्हणता येणार नाही. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा