Advertisement

Coronavirus Update : भारतीय रुग्णांना अमेरिकेचं 'हे' औषध देणार

सध्या इतर आजारांवर जी औषधं उपलब्ध आहेत, त्यांचं कोरोना रुग्णांवर ट्रायल सुरू आहे. असंच एक औषध भारतीय रुग्णांना देण्यात येणार आहे.

Coronavirus Update : भारतीय रुग्णांना अमेरिकेचं 'हे' औषध देणार
SHARES

कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव भारतात वाढत आहे. कोरोनाव्हायरसविरोधात (coronavirus) प्रभावी अशी लस (vaccine) अद्याप सापडली नाही किंवा औषध (medicine) नाही. अनेक देश कोरोनावर लस बनवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु कुणाला अजून यश आलं नाही. म्हणून सध्या इतर आजारांवर जी औषधं उपलब्ध आहेत, त्यांचं कोरोना रुग्णांवर ट्रायल सुरू आहे. असंच एक औषध भारतीय रुग्णांना देण्यात येणार आहे.

रेमडेसिवीर (Remdesivir) औषधामुळे कोरोना रुग्णांमध्ये सुधारणा होत असल्याचं दिसून आलं आहे. लवकरच भारतात कोरोना रुग्णांवर उपचारासाठी आपत्कालीन वापरासाठी या औषधाला परवानगी देण्यात आली आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं (Drugs Controller General of India) ही मंजुरी दिली आहे.

अमेरिकेतल्या गिलियड सायन्स (Gilead Sciences) कंपनीचं हे औषध आहे. एबोलासाठी हे औषध तयार करण्यात आलं, जे आता कोरोना रुग्णांसाठी फायदेशीर असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे अमेरिकेनंतर आता भारतातही हे औषध वापरलं जाणार आहे.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, "गंभीर कोरोना रुग्णांवर आप्ताकालीन वापरासाठी या औषधाला १ जूनला परवानगी देण्यात आली आहे", असं ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं ई-मेलमध्ये सांगितलं.

रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाचे कन्फर्म किंवा संशयित रुग्णांनाही हे औषध दिलं जाणार आहे. यामध्ये प्रौढ व्यक्ती आणि लहान मुलांचाही समावेश आहे. सामान्यपणे रुग्णांना दहा दिवस हे औषध दिलं जातं. मात्र भारतात फक्त ५ दिवस या औषधाचा डोस मर्यादित ठेवण्यात आला आहे.

सर्वात जास्त कोरोनाबाधित रुग्ण सापडलेला भारत हा जगातील सातवा देश आहे. भारताआधी अमेरिका, ब्राझील, रशिया, स्पेन, ब्रिटन आणि इटली या देशांनी २ लाखांचा आकडा पार केला आहे. दुसरीकडे देशात दररोज सरासरी ८ हजार नवीन प्रकरणं नोंदवली जात आहेत आणि जवळपास ३०० लोकांचा मृत्यू होत आहे.

आनंदाची बाब म्हणजे इतर देशांच्या तुलनेत भारताचा रिकव्हरी रेट सर्वात जास्त आहे. भारतात आतापर्यंत २ लाखांमधील ९५ हजार ८५२ रुग्ण निरोगी झाले आहेत. भारताचा रिकव्हरी रेट हा जवळजवळ ५० टक्के आहे. याचा अर्थ प्रत्येक १०० रुग्णांमधील ४८ रुग्ण बरे होत आहेत.



हेही वाचा

खासगी रुग्णालयांतील खाटांवर नजर ठेवणार महापालिका अधिकारी

'ही' आहे मुंबईतील कंटेनमेंट झोनची यादी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा