Advertisement

टास्क फोर्सची पालिकेकडे कोरोना चाचण्या वाढवण्याची मागणी

उद्धव ठाकरे यांनी गठित केलेल्या COVID 19 टास्क फोर्सनं पालिकेकडे दररोज किमान २०,००० चाचण्या घ्याव्यात अशी इच्छा व्यक्त केली.

टास्क फोर्सची पालिकेकडे कोरोना चाचण्या वाढवण्याची मागणी
SHARES

मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. उद्धव ठाकरे यांनी गठित केलेल्या COVID 19 टास्क फोर्सनं पालिकेकडे दररोज किमान २०,००० चाचण्या घ्याव्यात अशी इच्छा व्यक्त केली. याशिवाय उत्सवाच्या काळात अनलॉकमध्ये टास्क फोर्सनं पालिकेला चालते फिरते चाचणी केंद्र सुरू करण्यास सांगितलं आहे.

तसंच, उत्सव दरम्यान चेतावणी दिली की, निष्काळजीपणामुळे कोरोनोव्हायरसच्या घटनांमध्ये वाढ होऊ शकते. अहवालानुसार, पालिकेनं गेल्या आठवड्यात चाचण्यांची संख्या वाढवून २० हजार करण्याचा निर्णय घेतला. पालिका आयुक्तांसह झालेल्या बैठकीत इक्बालसिंग चहल आणि सर्व २४ प्रभागातील अधिकारी आणि सहाय्यक आयुक्तांना दैनंदिन लक्ष्ये पूर्ण करण्यास सांगण्यात आलं.

दुसरीकडे, शुक्रवारी महानगरपालिकेनं कोरोना संदर्भात मार्गदर्शक तत्त्वं जारी केली. ज्यात असं म्हटलं आहे की, आगामी नवरात्र उत्सवाच्या संदर्भात शहरातील सार्वजनिक सार्वजनिक (समुदाय) मंडळांनी भक्तांसाठी दर्शनाची ऑनलाईन व्यवस्था करावी.

महाराष्ट्र सरकारनं यापूर्वी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती आणि मंडळासाठी चार फूट आणि घरात दोन फूट दुर्गा देवीच्या मूर्तींची प्रतिस्थापना करण्यास सांगितलं होतं. या व्यतिरिक्त, प्रशासनानं मंडळांना पंडाल योग्य प्रकारे स्वच्छ करण्यास आणि सर्व नियमांचं काटेकोरपणे पालन करण्यास सांगितलं होतं.Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement