Advertisement

परवानगीशिवाय खासगी रुग्णालयांत कोरोनाबाधितांना भरती करण्यास मनाई

मुंबई महापालिकेनं खासगी रुग्णालयांना अशा सुचना दिल्या आहेत.

परवानगीशिवाय खासगी रुग्णालयांत कोरोनाबाधितांना भरती करण्यास मनाई
SHARES

दुसऱ्या लाटेप्रमाणे आताही मुंबईतल्या खासगी रुग्णालयात भरती होण्यासाठी कोविड रुग्णांना मुंबई महापालिकेची परवानगी घ्यावी लागणार आहे. तशा सूचना मुंबई महापालिकेनं खासगी रुग्णालयांना दिल्यात.

कोरोनाची तिसरी लाट आल्यामुळं, बेडची कमतरता भासू नये यासाठी मुंबई महापालिकेनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे. खासगी रुग्णालयांना ८० टक्के कोविड बेडची उपलब्धता ठेवण्यास सांगण्यात आलंय. तसंच सरकारनं निर्देशित केलेले दर आकारणं खासगी रुग्णालयांना बंधनकारक असणार आहे.

मुंबईत कोरोनाचा धोका वाढल्यानं महापालिका प्रशासन सज्ज झालं आहे. रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी दुसऱ्या लाटेप्रमाणेच पालिकेच्या परवानगीशिवाय खाजगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णाला दाखल करू नका, अशा सक्त सूचना प्रशासनानं रुग्णालयांना दिल्या आहेत.

यासाठी पालिकेनं नुकतिच खासगी रुग्णालयांसाठी नियमावलीही जाहीर केलीये. यासोबत बेड्स वाढवण्यासोबत रुग्णांसाठी आयसीयू वॉर्ड सज्ज ठेवा, अशा सूचनाही पालिकेनं खासगी रुग्णालयांना दिल्या आहेत.

कोरोनानं मुंबईची काळजी वाढवली आहे. देशाच्या आर्थिक राजधानीत कोरोना रुग्णांचा उद्रेक होत असल्याचं पाहायला मिळतंय. मुंबईत दिवसभरात २० हजारांच्या घरात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली तर लॉकडाऊन लावावा लागेल, असे संकेत आयुक्त इक्बाल चहल यांनी दिले आहेत.

बुधवारी मुंबईत दिवसभरात तब्बल १५ हजार १६६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. रोज आढळणाऱ्या रुग्ण संख्येत २० ते ३० टक्क्यांनी वाढ होत आहे. त्यामुळे रोज वाढणारी रुग्ण संख्या मुंबईसाठी चिंतेची बाब ठरत आहे.



हेही वाचा

'या' वॉर्डच्या सीलबंद इमारतीतील सर्वांना अँटिजेन चाचणी बंधनकारक

क्रूझमधील आणखी १३९ प्रवाशांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा