Advertisement

क्रूझमधील आणखी १३९ प्रवाशांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह

आतापर्यंत क्रूझमधील कोरोना रुग्णांचा आकडा २०५ झाला आहे.

क्रूझमधील आणखी १३९ प्रवाशांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह
(Representational Image)
SHARES

बुधवार, ५ जानेवारी रोजी, कॉर्डेलिया क्रूझच्या १,८२७ ऑनबोर्डवरून, आणखी १३९ प्रवाशांची कोविडची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सुरुवातीला ६६ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण असलेली क्रूझ मंगळवार, ४ जानेवारी रोजी संध्याकाळी गोव्याहून मुंबईत पोहोचले होते.

क्रूझमधील २०५ प्रवाशांना विषाणूची लागण झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) नं ४१ रुग्णांना रिचर्डसन क्रुडास कोविड-19 सुविधा तसंच खाजगी हॉटेलमध्ये हलवले होते. उर्वरित बुधवारी उशिरापर्यंत जहाजावर होते. खात्यांनुसार, BMC नं क्वारंटाईन सुविधांमध्ये नेण्यात आलेल्या प्रवाशांशिवाय इतर कोणत्याही प्रवाशांना उतरण्याची परवानगी दिली नाही.

पालिकेच्या ए वॉर्डचे सहाय्यक आयुक्त शिवदास गुरव यांनी सांगितलं की, गोव्यात क्रूझमध्ये ६६ पॉझिटिव्ह रुग्ण होते ज्यापैकी सहा खाली उतरले होते. मुंबईत चाचण्या घेतल्या असता आणखी १३९ जणांना संसर्ग झाल्याचं आढळून आलं.

मंगळवारी संध्याकाळी, प्रशासकिय संस्थेनं २ खाजगी लॅबद्वारे १,८२७ प्रवाशांच्या आरटी-पीसीआर चाचण्या घेतल्या आणि बुधवारी पहाटे ५ वाजेपर्यंत चाचण्या सुरू होत्या. एका प्रयोगशाळेनं ९९५ चाचण्या केल्या. त्यापैकी १२३ पॉझिटिव्ह आले. इतर प्रयोगशाळेत बुधवारी ८३२ चाचण्या करण्यात आल्या त्यापैकी १६ जण पॉझिटिव्ह आले.

ज्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे त्यांना अनिवार्य सात दिवस होम क्वारंटाईन करावं लागेल. बुधवारी रात्री ९ वाजता १०० जणांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली, अशी टिप्पणी गुरव यांनी केली.



हेही वाचा

मुंबईतील २३० डॉक्टरांना कोरोनाची लागण

मुंबईत १ कोटी नागरिकांचा पहिला डोस पूर्ण

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा