Advertisement

राज्याने ओलांडला १ कोटी चाचण्यांचा टप्पा

एका बाजूला महाराष्ट्रात कोरोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना राज्याने १ कोटी कोरोना चाचण्यांचा टप्पा ओलांडला आहे.

राज्याने ओलांडला १ कोटी चाचण्यांचा टप्पा
SHARES

एका बाजूला महाराष्ट्रात कोरोना संसर्गाची (coronavirus) दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना राज्याने १ कोटी  कोरोना चाचण्यांचा टप्पा ओलांडला आहे. सोबतच राज्यात शुक्रवारी ६९४५ रुग्ण बरे होऊन घरी गेल्याने बरे होऊन घरी जाणाऱ्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या १६ लाख ४२ हजार ९१६ इतकी झाली आहे. यामुळे राज्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचं प्रमाण (Recovery Rate) ९२.८९ टक्के एवढं झालं आहे.

दरम्यान, शुक्रवारी राज्यात ५,६४० नवीन रुग्णांचं निदान झालं असून १५५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्याचा मृत्यूदर २.६३ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ३५ हजार ६६५  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७ लाख ६८ हजार ६९५ (१७.६२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. 

दिवाळीनंतर महापालिकेनं मुंबईतील चाचण्यांची संख्याही वाढवण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी १७,३०० चाचण्या करण्यात आल्या. त्यातून १०३१ रुग्ण बाधित आढळले आहेत. तसंच, १३ रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांचा एकूण आकडा १०,६३७ वर गेला आहे. ५५३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. सध्या ९०४६ रुग्ण उपचाराधीन आहेत, तर रुग्ण दुपटीचा सरासरी कालावधी आता २९६ दिवसांवर घसरला आहे.

हेही वाचा- गर्दी टाळण्यासाठी माहीम दर्गा भाविकांना देणार पास

सध्या राज्यात ५ लाख ५८ हजार ०९० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर ४,८८३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील ॲक्टीव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन ७८ हजार २७२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी दिली.

कोरोनाची दुसरी लाट येऊ नये म्हणून राज्यातील सर्व जनतेला सतर्क राहून आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. कोविड सेंटर्स, रुग्णालये, स्थानिक प्रशासनाला देखील औषधे, साधनसामुग्रीचा पुरेसा साठा करून दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. शिवाय कोरोना चाचण्यांमध्ये जराही खंड पडता कामा नये, असे निर्देश देखील देण्यात आलेले आहेत. 

सोबतच मुंबईत दिवाळीनंतर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काही प्रमाणात वाढत असल्याने राज्यातील जनतेने केरळ आणि दिल्लीचा बोध घ्यावा, असं आवाहन देखील राजेश टोपे यांनी केलं आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा