Advertisement

डेंग्यू, चिकनगुनिया, लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांमध्ये वाढ

ऑगस्टमध्ये रुग्णांची संख्या अधिक वाढली आहे.

डेंग्यू, चिकनगुनिया, लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांमध्ये वाढ
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (bmc) जून आणि जुलैच्या तुलनेत या महिन्यात शहरात पावसाळ्याशी संबंधित डेंग्यू (dengue), चिकनगुनिया (chikungunya), लेप्टोस्पायरोसिसच्या (leptospirosis) प्रकरणांमध्ये वाढ नोंदवली आहे.

प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, 1 ते 14 ऑगस्ट दरम्यान डेंग्यूच्या 555 रुग्णांची नोंद झाली आहे. तर जुलैमध्ये 535 रुग्ण आणि जूनमध्ये केवळ 93 रुग्णं आढळून आली आहेत.

दरम्यान, चिकुनगुनियाच्या तुलनेत तिप्पट वाढ झाली आहे. जुलैमध्ये ही संख्या 25 होती. मात्र ऑगस्टमध्ये ही संख्या 84 इतकी झाली आहे. जुलैमध्ये दररोज मलेरियाच्या 25 रुग्णांची नोंद झाली होती. तर ऑगस्टमध्ये ही संख्या 40 वर पोहोचली आहे.

पावसाळ्यातील (mumbai rains) इतर आजार जसे की लेप्टोस्पायरोसिस (दूषित पुराच्या पाण्यातून पसरणारे विषाणू संसर्ग) सातत्याने वाढत आहेत. यात जूनमध्ये 28 तर जुलैमध्ये 141 आणि ऑगस्टमध्ये ही संख्या 172 वर पोहोचली आहे. जुलैमध्ये H1N1 ची प्रकरणे 161 होती आणि अवघ्या 15 दिवसांत त्यांची संख्या 119 झाली.

जुलैमध्ये पावसाळ्यातील (monsoon) आजारांच्या तुलनेत आलेख अधिक उंचावलेला दिसतो. याशिवाय, पावसाळा सुरू झालेल्या जूनमध्ये डेंग्यू, चिकुनगुनिया आणि लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांची संख्या तुलनेने कमी होती.

तज्ज्ञांच्या मते, पाऊस पूर्णपणे थांबल्यानंतरही हे आजार एक-दोन आठवडे टिकू शकतात. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत किंवा अखेरीस प्रकरणांमध्ये घट होण्याची अपेक्षा आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास ऑक्टोबरपर्यंत रुग्णांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.



हेही वाचा

सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधील सफाई कामगाराच्या मृत्यूप्रकरणी तीन डॉक्टर निलंबित

मध्य रेल्वेची प्रवाशांसाठीची डॉक्टर-ऑन-कॉल सेवा यशस्वी

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा