Advertisement

२ ते १८ वर्षांच्या मुलांना 'ही' व्हॅक्सीन देणार, DGCIची मंजूरी

केंद्र सरकारनं २ ते १८ वर्षांच्या मुलांसाठीच्या व्हॅक्सीनला मंजूरी दिली आहे.

२ ते १८ वर्षांच्या मुलांना 'ही' व्हॅक्सीन देणार, DGCIची मंजूरी
SHARES

देशात आता बालकांना देखील कोरोना व्हॅक्सीन (Corona vaccine) दिली जाणार आहे. केंद्र सरकारनं २ ते १८ वर्षांच्या मुलांसाठी स्वदेशी कोव्हॅक्सीनला (Covaxin) मंजूरी दिली आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच DCGI नुसार, लसीचे दोन डोस देण्यात येतील. याच्या मार्गदर्शक सूचना अद्याप जारी होणे बाकी आहे.

DCGI च्या सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीनं मुलांना लस देण्याची प्रोसेस आणि दोन डोसमधील अंतराविषयी देखील माहिती दिली आहे.

सध्या देशात प्रौढांना तीन लस दिल्या जात आहेत. कोव्हॅक्सिन (Covaxin), कोवीशील्ड (Covishiled) आणि स्पूतनिक व्ही (SputnikV) यामधून कोव्हॅक्सीन भारत बायोटेकनं बनवली आहे. कोवीशील्ड बनवणारे सीरम इंस्टीट्यूट देखील मुलांची व्हॅक्सीन कोव्हॅक्सीन बनवण्याची तयारी करत आहे. तर जायडस कॅडिलाची व्हॅक्सीन जायकोव-डीची क्लिनिकल ट्रायल पूर्ण झाली आहे. त्याच्या मंजूरीची प्रतिक्षा आहे. ही प्रौढांसह बालकांना देखील दिली जाऊ शकेल.

कोव्हॅक्सीनच्या तीन फेजच्या ट्रायलरनंतर बालकांना देखील देण्याची मंजूरी देण्यात आली आहे. जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये देखील अशा प्रकारच्या ट्रायल्सनंतर मुलांसाठी व्हॅक्सीनला मंजूरी देण्यात आली आहे.

यूरोपमध्ये मॉर्डर्नाच्या लसीला बालकांसाठी मंजूरी देण्यापूर्वी १२ ते १७ वर्षांच्या ३ हजार ७३२ बालकांवर ट्रायल करण्यात आली होती. ट्रायलचे परीणाम देखील समोर आले होते की, लसीनं मुलांमध्ये देखील प्रौढांच्या बरोबरीनं अँटीबॉडी प्रोड्यूस केली आहे.

ट्रायलदरम्यान २ हजार १६३ मुलांना कोरोना व्हॅक्सीन दिली गेली होती आणि १ हजार ०७३ जणांना प्लास्बो. ज्या २ हजार १६३ बालकांना लस देण्यात आली होती, त्यांच्यामधून कुणालाही कोरोना झाला नाही आणि कोणताही गंभीर दुष्परिणाम देखील झालेला नाही.

चीनी व्हॅक्सीन कोरोनावॅक देखील ३ ते १७ वर्षांपर्यंतच्या मुलांवर प्रभावी दिसली आहे. कंपनीनं दोन फेजमध्ये ५५० पेक्षा जास्त मुलांवर लसीची ट्रायल केली होती. कंपनीनं सांगितलं की, ट्रायलमध्ये समाविष्ट केवळ दोन मुलांनाच लसीनंतर तीव्र ताप आला होता. इतरांमध्ये कोणताही साइड इफेक्ट दिसला नाही. लसीकरणानंतर ९८% बालकांमध्ये अँटीबॉडी प्रोड्यूस झाल्या.

फायझरनं १२ ते १५ वर्षे वयोगटातील २ हजार २६० मुलांवर चाचणी केली. त्यापैकी १ हजार १३१ जणांना लस देण्यात आली आणि उर्वरित १ हजार १२९ जणांना प्लास्बो देण्यात आला. लस घेतलेल्या १ हजार १३१ मुलांपैकी कोणालाही गंभीर दुष्परिणाम दिसले नाही. चाचणीच्या निकालानंतर, फायझरनं सांगितलं की, त्याची लस मुलांमध्ये १००% प्रभावी आहे.हेही वाचा

राज्यातील 'या' ५ जिल्ह्यांत सर्वाधिक सक्रिय रुग्ण

५ जम्बो केंद्रात ७४८ आयसीयू, ४०९९ ऑक्सिजन खाटा

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा