Advertisement

ग्लुकोस्ट्रीपची किंमत कमी करा, मधुमेहग्रस्तांची मागणी


ग्लुकोस्ट्रीपची किंमत कमी करा, मधुमेहग्रस्तांची मागणी
SHARES

भारतात मधुमेहग्रस्तांची संख्या जास्त असल्याने देशात ग्लुकोस्ट्रीपची मागणीही वाढत आहे. मधुमेह तपासणीसाठी ग्लुकोस्ट्रीपसाठी दिवसाला २५ ते ३० रुपये म्हणजे महिन्याला किमान १ हजार रुपये मोजावे लागतात. पण, सर्वसामान्य रुग्णांना मधुमेहावरील इतर औषधांसोबत दररोज ग्लुकोस्ट्रीपसाठी रक्कम खर्च करणं शक्य नसल्याने ग्लुकोस्ट्रीपची किंमत कमी करण्याची मागणी मधुमेहतज्ज्ञ डॉ. प्रदीप गाडगे यांनी केली आहे.

आंतरराष्ट्रीय मधुमेह संघटनेच्या नोंदीनुसार २०१५ मध्ये भारतात मधुमेहाचे ६९.९ दशलक्ष रुग्ण आढळून आले होते. लठ्ठपणा, अनिद्रा, हृदयविकार यांसारख्या विकारांमुळे मधुमेहाचा धोका वाढत आहे.


उत्पादन खर्च ५० पैसे

सद्यस्थितीत एका ग्लुकोस्ट्रीपचा उत्पादन खर्च अवघा ५० पैसे आहे. पण, बाजारात एक ग्लुकोस्ट्रीप २५ ते ३० रुपयांना मिळते. ज्या रुग्णांना दिवसातून दोनदा तपासणीसाठी ग्लुकोस्ट्रीप वापरावी लागते. मात्र सर्वसामान्य रुग्णांना हा खर्च परवडणारा नसल्याने ग्लुकोस्ट्रीपची विक्री किंमत सर्वांना परवडण्याजोगी असावी, या उद्देशाने गाडगे डायबेटिक सेंटरचे मधुमेहतज्ज्ञ डॉ. प्रदीप गाडगे यांनी सही अभियान सुरू केलं आहे. या मोहिमेत आतापर्यंत १२ हजार मधुमेही रुग्णांनी सहभाग घेतला आहे.


टाईप वन डायबेटिसच्या रुग्णांना दिवसातून ३ ते ४ वेळा रक्तातील ग्लुकोजची पातळी तपासावी लागते, सर्व सामान्य रुग्णाला हा खर्च परवडण्यासारखा नसल्याने ग्लुकोस्ट्रीपची किंमत कमी करावी अशी आमची मागणी आहे.

- डॉ. प्रदीप गाडगे, मधुमेहतज्ज्ञ

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा