Advertisement

आयव्हीएफ प्रक्रीया करणं बंधनकारक


आयव्हीएफ प्रक्रीया करणं बंधनकारक
SHARES

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात सुरु असलेल्या लॉकडाऊनचे ४ टप्पे पार पडले आहेत. तसंच, हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येण्याकरिता अनलॉक १.० च्या माध्यमातून निर्बंध कमी करण्यात आले आहे. या लॉकडाऊनच्या काळात आयव्हीएफ (इन विट्रो फर्टिलायझेशन)च्या माध्यमातून पालकत्वाचा प्रवास सुरू करण्यासाठी अनेक जोडप्यांनी माघार घेतल्याचं दिसून आले.

सध्या कोरोनावर औषध उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत एखाद्या महिलेला गर्भधारणा झाली, तर साडेतीन महिन्यांत बाळाच्या शरिराचा विकास होतो. या काळात कोरोनाच्या विषाणूचा बाळावर काही परिणाम होतो का याची जोडप्यांना भीती वाटते. ही प्रक्रिया आता किती सुरक्षित असेल याबद्दल बरेच जोडप्यांना नक्कीच शंका येत असतील.

सद्य परिस्थितीत रुग्णालयांना भेट देणे योग्य ठरल का? आपण ही प्रकीया पुन्हा पुढे ढकलल्यास योग्य राहिल का? असे अनेक प्रश्न या जोडप्यांना भेडसावत आहेत.

टेस्ट ट्यूब बेबी किंवा इन व्रिटो गर्भधारणा (आयव्हीएफ) ही वंधत्व निवारणावरील सर्वात उत्तम आणि आधुनिक उपचार पध्दती आहे. आयव्हीएफ उपचार पध्दतीत शुक्रजंतुच्या मदतीनं बीजफलन केलं जातं आणि त्यानंतर हे फलित बीज गर्भाशयात सोडले जाते, जेणेकरून एक सुदृढ गर्भ आकारास येऊ शकेल. आयव्हीएफ उपचार पद्धतीमध्ये अगदी सुरूवातीस रूग्णास गोनॅडोट्रोफिन्सची (पुनरूत्पादक संप्रेरके) इंजेक्‍शन्स (अंडाशयास उत्तेजित करण्यासाठी) दिली जातात. त्यानंतर जनरल ऐनेस्थेशिया (संपूर्ण भूल) देऊन उसाईट पिकअप नावाची एक छोटी प्रक्रिया केली जाते, ज्यामध्ये अंडाणु पूर्वस्थितीत येण्यासाठी अल्ट्रासाउंड मशीनचा वापर केला जातो.

इनक्‍युबेटरमध्ये बीज सुरक्षितपणे स्थापित केल्यानंतर शुक्रजंतू आणि बीज यांना एकत्र आणण्यासाठी इन्ट्रा सायटोप्लास्टिक स्पर्म इंजेक्‍शन (आयसीएसआय) दिले जाते. या पद्धतीमध्ये प्रत्येक शुक्रजंतुबरोबर प्रत्येक बीज स्वतंत्रपणे इंजेक्‍ट केले जाते. एकदा ही बीज फलनाची प्रक्रिया पार पडली की त्यातून तयार झालेले गर्भ वेगवेगळ्या काळासाठी इनक्‍युबेटरमध्ये ठेवले जातात. हा कालावधी संपल्यानंतर त्यापैकी उत्कृष्ट गर्भ निवडून गर्भाशयामध्ये पुनःस्थापित केले जातात. या प्रक्रियेस एम्ब्रयो ट्रान्सफर (ईटी) असे म्हंटले जाते.

या महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष करू नका

  • जर आपण लॉकडाऊन दरम्यान आयव्हीएफ ट्रीटमेंटची निवड करण्याचा विचार करीत असाल तर रूग्णाच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या कर्मचार्‍यांना सुरक्षा मिळावी यासाठी सुरक्षिततेचे सर्व उपाय अवलंबिलेले क्लिनिक शोधा.
  • क्लिनिकला भेट देताना तुम्ही सर्व सुरक्षा उपायांचे पालन केले असल्याचे सुनिश्चित करा. मास्क घाला आणि घराबाहेर पडण्यापूर्वी सॅनिटायझर आपल्याबरोबर ठेवा.
  • प्रक्रियेदरम्यान आपल्याला शंका असल्यास आपण फोनवरून सल्ला घेण्यासारख्या पर्यायांची निवडू निवड करू शकता.
  • आयव्हीएफ उपचार सुरू करताना समुपदेशन करणे फायदेशीर ठरेल. डॉक्टरांकडून शंकांचे निरसन करून घ्या.
  • आपण भेट देणारे क्लिनिक वेळोवेळी सर्व वैद्यकीय उपकरणे निर्जंतुकीकरण करतात का याची खात्री करुन घ्या. तसेच, सोशल डिस्टंसिंगचे पालन करा.
  • आपण आयव्हीएफ उपचाराची घेणार असाल किंवा घेत असाल तर धूम्रपान आणि मद्यपान टाळा. कारण आपल्या उपचारांवर याचा हानिकारक परिणाम होऊ शकतो.
  •  रोज संतुलित आहाराचे सेवन करा आणि व्यायामाला प्राधान्य द्या. फळे, भाज्या, धान्य, दुध, शेंगदाणे, बियाणे यांचा आहारात समावेश असू द्या.
  • साखर, चहा किंवा कॉफीत असणारे उत्तेजक द्रव्य, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि जंक फूडचे सेवन टाळा. आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्या.
  • योग आणि ध्यान यांच्या माध्यमातून मानसिक आरोग्य जपण्याचा प्रयत्न करा. 
  • पुरेशी झोप घ्या.



हेही वाचा -

मुसळधार पावसामुळे मुंबईतील 'हे' रस्ते बंद

पीपीई कीटमध्येच डॉक्टर तरुणी थिरकली ‘हाय गर्मी’वर, पहा हा भन्नाट डान्स



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा