Advertisement

मुंबईतील 'ह्या' विभागांमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी तब्बल १०८ दिवसांवर

मुंबईत कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महापालिकेचा आरोग्य विभाग रात्रंदिवस काम करत आहे. याला आता यश येत असल्याचं दिसून येत आहे.

मुंबईतील 'ह्या' विभागांमध्ये रुग्ण दुपटीचा कालावधी तब्बल १०८ दिवसांवर
SHARES

मुंबईत कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी महापालिकेचा आरोग्य विभाग रात्रंदिवस काम करत आहे. याला आता यश येत असल्याचं दिसून येत आहे. पालिकेच्या एच पूर्व आणि एफ उत्तर या दोन विभागांमधील  रुग्ण दुपटीचा कालावधी आता तब्बल १०० दिवसांच्या वर गेला आहे. तर मुंबईतील ८ विभागातील हा कालावधी ५० दिवसांपेक्षा अधिक झाला आहे. महापालिका क्षेत्रांचा विचार केल्यास रुग्ण दुपटीचा कालावधी १०० दिवसांपेक्षा अधिक असणारे देशातील हे एकमेव उदाहरण आहे.

वांद्रे पूर्व, खार पूर्व इत्यादी भागांचा समावेश असणाऱ्या एच पूर्व विभागात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १०८ दिवस झाला आहे. तसंच माटुंगा, वडाळा या परिसरांचा समावेश असणाऱ्या एफ उत्तर विभागातही रुग्ण दुपटीचा कालावधी १०८ दिवसांवर गेला आहे. मुंबई

महापालिका क्षेत्रातील २४ विभागातील रुग्ण दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी ४१ दिवस आहे. एम पूर्व विभाग (मानखुर्द, गोवंडी) येथे ७९ दिवस, इ विभाग (भायखळा) ७७ दिवस, एल विभाग (कुर्ला) ७३ दिवस, बी विभाग (सँडहर्स्ट रोड) ७१ दिवस, ए विभाग (कुलाबा, फोर्ट) ७० दिवस, एम पश्चिम (चेंबूर) ६१ दिवस, जी उत्तर’ (दादर) ६१ दिवस आणि जी दक्षिण (वरळी, प्रभादेवी) या भागांमधील रुग्ण दुपटीचा कालावधी ५६ दिवस आहे.




हेही वाचा -

शिवसेना भवनातील ३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

पश्चिम रेल्वेवर ४० फेऱ्या वाढवण्याचा निर्णय, अनेकांना दिलासा




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा