Advertisement

शरीराची प्रतिमा ठरतेय मानसिक तणावाला कारणीभूत

शरीराची प्रतिमा ठरतेय मानसिक तणावाला कशी कारणीभूत आहे याबाबत मुंबईतील सैफी रूग्णालयातील बँरिअँट्रिक आणि लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. अपर्णा गोविल सांगत आहेत.

शरीराची प्रतिमा ठरतेय मानसिक तणावाला कारणीभूत
SHARES

प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, वागणूक कशी आहे यावरून नव्हे तर ती व्यक्ती दिसायला सुंदर आहे का? यावरून तिची प्रतिमा ठरत असते. व्यक्ती चांगली असल्यापेक्षा तिचं दिसणं जास्त महत्त्वाच असतं, हा समाजाचा नियमच आहे. म्हणून सुंदर दिसण्यासाठी आजकाल प्रत्येक जण प्रयत्न करतोय. त्यात लठ्ठ व्यक्तींचाही समावेश आहे. बरेचदा लठ्ठपणामुळे लोक चेष्ठेचा विषय बनतात. त्यामुळे वजन जास्त असणाऱ्या व्यक्ती या समाजात मानसिक दडपणाखाली वावरताना दिसून येतात.

शरीराची प्रतिमा ठरतेय मानसिक तणावाला कशी कारणीभूत आहे याबाबत मुंबईतील सैफी रूग्णालयातील बँरिअँट्रिक आणि लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. अपर्णा गोविल सांगत आहेत.

 शरीराची प्रतिमा म्हणजे नक्की काय? 

शरीराची प्रतिमा (बॉडी इमेज) व्यक्तिमत्वाची प्रतिमा आहे, जी लोकांना स्वतःच्या शरीराची असते, जी त्यांचे शरीर प्रत्यक्षात कसे दिसते. हे ठरवले जाते. आपल्या शरीराची प्रतिमा ही विश्वास, विचारधारणा, भावना आणि वर्तणुकीपासून बनलेली असते. इतकंच नाहीतर आपल्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर शरीराची प्रतिमा प्रभाव पाडत असते. नकारात्मक शरीराची प्रतिमा असल्यास त्याचा आपल्या मानसिक तसेच शारीरिक आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. त्याचा नकारात्मक मार्गाने इतरांशी असलेल्या संबंधांवरही परिणाम होऊ शकतो.

नकारात्मक शरीराची प्रतिमा असलेले लोक आरशात स्वतःकडे पाहणे टाळतात. कारण, या लोकांमध्ये आत्मविश्वास कमी झालेला असतो. हे लोक अनेकदा शरीराचा एखादा भाग लपवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे कपडे परिधान करतील. विशेषतः असे अनेक मानसिक रूग्ण आहेत, अतिरिक्त व्यायाम करून स्वतःला इजा करून घेतात.

दैनंदिन जीवनातील विविध कारणांमुळे येणारे नैराश्य वजन वाढण्याचे महत्त्वाचे कारण आहे. अतिलठ्ठ व्यक्तींकडे समाज एक वेगळ्याच नजरेनं पाहतो. व्यक्तीच्या स्वभावापेक्षा त्याच्या बाह्य रूपावरून लोक त्याच्याशी कसं वागायचं हे ठरवतात आणि त्या पद्धतीने त्याला वागणूक देतात. लठ्ठपणामुळे अनेक लोकांना घराबाहेर पडणे अवघड होते. लोक त्यांची खिल्ली उडवतात म्हणून लठ्ठ व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो. यासाठी काही लोक वजन कमी करण्यासाठी आणि शरीराच्या आकाराबद्दल कोणाकडूनही सल्ला घेतात. याचा परिणाम शारीरिक आरोग्यावर पडतो. आपण इतरांसारखे नाही किंवा आपल्यात कमतरता आहे. या विचारांनी त्यांच्यामध्ये नैराश्य हा आजार अधिक दिसून येतो.

 नकारात्मक प्रतिमा कशी सुधाराल...      

 - काहीवेळा एखादी विशिष्ट प्रकारची वस्त्रे परिधान केल्यास अस्वस्थ वाटते. तरीही त्यांना परिधान करा. सुरूवातीला अस्वस्थ वाटेल. त्यानंतर हळुहळु सवय होईल. 

- स्वतःवर प्रेम करा आणि आपले वेगळे अस्तित्वात निर्माण करण्याचा प्रयत्न करा.·     

 - कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नसते, हे समजून घ्या. चंद्रावरही डाग आहे. त्यामुळे आपल्या त्वचेचा रंग, उंची, वजन इत्यादींना जास्त महत्त्व देऊ नका.

- स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या.

- इतरांशी बोलताना सकारात्मक गोष्टींचा विचार करा. त्यांनी विचारलेल्या नकारात्मक गोष्टींचा विचार करू नका

- जेव्हा एकदी व्यक्ती तुमची प्रशंसा करून तुमच्यातील चुका दाखवतो. तेव्हा त्या व्यक्तीला प्रतिउत्तर न करता गोड बोलून संभाषण थांबवून तेथून निघून जा.

- रात्री झोपण्यापूर्वी दिवसभरात घडलेल्या गोष्टींचा विचार करा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काय करायचं हे ठरवा.

 शरीराची प्रतिमा आणि आरोग्य -

मानवी शरीरात सतत बदलत होत असतात. त्यामुळे शरीर स्वास्थ्य राहण्यासाठी शरीराच्या प्रतिमेवर जास्त लक्ष केंद्रीत करणे आवश्यक आहे. त्यातच वजन वाढीवरही नियंत्रण ठेवणे गरजेचं आहे. लठ्ठपणामुळे विविध आजारांना आमंत्रण मिळते. यात लठ्ठ व्यक्तींमध्ये टाइप 2 मधुमेह, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल, हृदयरोग, मूत्रपिंड विकार, फुफ्फुस आणि यकृता संबंधित विकार वाढताना दिसून येत आहेत.

 हे आजार टाळण्यासाठी वजन कमी करणं महत्त्वाचे आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी काय करावे... 

- वजन कमी करण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तींनी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ल्यानुसार वजन कमी करा

- लठ्ठपणा कमी करण्यासाठी निरोगी आहार घेणं गरजेचं आहे. यासाठी आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. 

- मसालेदार, तेलकट आणि जंकफूडचे सेवन करणे टाळावेत. 

- आहारात साखरेचं अतिरिक्त सेवन करू नयेत.

- आठवड्यातून ५ दिवस व्यायाम करा. दररोज किमान ४० ते ४५ मिनिटे व्यायाम केल्यास वजन कम करण्यास मदत मिळते. याशिवाय चालणे, धावणे, पोहणे, सायकलिंग करणे, योगासने, जिमिंग आणि नृत्याचा सराव केल्यास वजनावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.

- रात्री पुरेशी झोप घेणं आवश्यक आहे.·     

- तीव्र लठ्ठपणामुळे त्रस्त असलेल्या व्यक्तींना वजन कमी करण्यासाठी बँरिअँट्रिक सर्जरी हा उत्तम पर्य़ाय आहे. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे. इतकंच नाहीतर जीवनशैलीत योग्य तो बदल केल्यास लठ्ठपणावर मात करता येऊ शकते.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा