Advertisement

अँटी कोरोना औषध ११-१२ मेपासून उपलब्ध, डीआरडीओच्या अध्यक्षांची माहिती

२-डेओक्सी-डी-ग्लुकोज (२-डीजी) असे नाव असलेल्या औषधामुळे कोरोना रुग्ण लवकर बरे होतात. तसेच त्यांना बाहेरून द्याव्या लागणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण खूपच कमी होते.

अँटी कोरोना औषध ११-१२ मेपासून उपलब्ध,  डीआरडीओच्या अध्यक्षांची माहिती
SHARES

डीआरडीओने कोरोनावर बनलेल्या २-डीजी या औषधाच्या आपत्कालीन वापराला परवानगी देण्यात आली आहे. हे औषध आता  ११-१२ मे पासून बाजारात उपलब्ध होण्यास सुरुवात होईल, अशी माहिती डीआरडीओचे अध्यक्ष जी. सतीश रेड्डी यांनी दिली. 

२-डेओक्सी-डी-ग्लुकोज (२-डीजी) असे नाव असलेल्या औषधामुळे कोरोना रुग्ण लवकर बरे होतात. तसेच त्यांना बाहेरून द्याव्या लागणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण खूपच कमी होते. या औषधाच्या डोसनंतर ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णाला २ ते ३ दिवसांमध्ये ऑक्सिजन सपोर्टवरून काढता येईल. 

डीआरडीओ आणि डॉ. रेडीज लॅबद्वारे तयार केल्या जाणाऱ्या या औषधाला औषध महानियंत्रकाकडून मंजुरी मिळाली आहे. सुरुवातीला या औषधाचे कमीतकमी दहा हजार डोसेस बाजारात येऊ शकतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच रुग्णांनी हे औषध घ्यावे, असं रेड्डी यांनी म्हटलं आहे.  
या औषधाच्या तीन वेळा मानवी चाचण्या झाली आहे.  देशभरात ११ रुग्णालयांमध्ये ११० कोरोना रुग्णांवर या औषधाच्या दुसऱ्या फेरीतील चाचण्या गेल्या वर्षी मे ते ऑक्टोबर या कालावधीत पार पडल्या. ज्यांनी हे औषध घेतले नव्हते त्यांच्यापेक्षा ज्यांनी हे औषध घेतले होते ते अडीच दिवस आधीच बरे झाले. 

या औषधाची मानवी चाचण्यांची तिसरी फेरी डिसेंबर २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत महाराष्ट्रासह देशभरातील २७ रुग्णालयांमध्ये पार पडली. त्यात सहभागी झालेल्यांपैकी ४२ टक्के रुग्णांच्या प्रकृतीत खूप सुधारणा होऊन त्यांना बाहेरुन ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची गरज उरली नाही. तर ज्यांना हे औषध दिले नव्हते त्या रुग्णांपैकी फक्त ३१ टक्के रुग्णांनाच बाहेरून दिलेल्या ऑक्सिजनची गरज उरली नाही. 



हेही वाचा -

आठवड्याभरात 'इतक्या' पोलीसांना कोरोनाची लागण

  1. धक्कादायक! पतीच्या संशयावरुन पत्नीची ट्रेन खाली आत्महत्या
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा