Advertisement

पुरेशा लस साठ्याअभावी शुक्रवारी अनेक ठिकाणी लसीकरण बंद

केंद्राकडून अपेक्षित लसींचा साठा उपलब्ध न झाल्यानं मुंबईतील लसीकरण मोहीम पुन्हा थंडावली आहे. परिणामी शुक्रवारी लसीकरण मोहीम बंद राहणार आहे.

पुरेशा लस साठ्याअभावी शुक्रवारी अनेक ठिकाणी लसीकरण बंद
SHARES

कोरोनाच्या (coronavirus) वाढत्या प्रादुर्भावाल आळा घालण्यासाठी लसीकरण हाच एक जालीम उपाय मानला जात आहे. यामुळं सुंपूर्ण जगभरात लसीकरण केलं जात आहे. शिवाय लसीकरणात महाराष्ट्र अव्वल असून, राज्यातील बहुतांश नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. परंतू, केंद्राकडून अपेक्षित लसींचा साठा उपलब्ध न झाल्यानं मुंबईतील लसीकरण मोहीम पुन्हा थंडावली आहे. परिणामी शुक्रवारी लसीकरण मोहीम बंद राहणार आहे.

लसींचा साठा मर्यादित असल्यानं गुरुवारी दिवसभरात केवळ ४५ हजार नागरिकांना लस मिळाली. सरकारी आणि पालिका (bmc) केंद्रावर तर केवळ १५ हजार नागरिकांना डोस मिळू शकले. तर अनेकांना डोस न घेताच घरी परतावे लागले. दरम्यान, लसींचा साठा शिल्लक नसल्याने शुक्रवारी लसीकरण मोहीम बंद राहणार आहे. मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. त्यानुसार आतापर्यंत ५९ लाख २९ हजार १९० नागरिकांनी लस घेतली आहे.

गेले काही दिवस लसींचा साठा सुरळीत सुरू असल्याने दररोज सरासरी एक लाखाहून अधिक नागरिकांना लस मिळत होती; मात्र या आठवड्यात केंद्राकडून मर्यादित साठा उपलब्ध झाल्यामुळे लसीकरण मोहीम थंडावली आहे. गुरुवारी काही मोजक्याच पालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांवर लसीकरण करण्यात आले. गुरुवारी महापालिकेच्या २८३ केंद्रांवर जेमतेम १४ हजार लोकांना लस देण्यात आली. तर खासगी लसीकरण केंद्रांमध्ये २८ हजार लोकांना लस देण्यात आली.

सरकारच्या २० केंद्रांमध्ये १६०० लोकांना लस देण्यात आली. म्हणजेच एकूण ४५ हजार लोकांना लस देण्यात आली; मात्र पुढील दोन दिवस लस येण्याची शक्यताही कमी आहे. जेव्हा लस उपलब्ध होईल तेव्हाच लसीकरण मोहीम सुरू होईल, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

मुंबईत गुरुवारी कोरोनाचे (covid 19) नवीन ५४० रुग्ण आढळले. तर ६२८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसंच १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत आतापर्यंत एकूण ७ लाख १ हजार १९५ रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत एकूण १५ हजार ५८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९६ टक्के इतके आहे. तर रुग्णवाढीचा दर ०.०८ टक्के इतका खाली आला आहे. तसंच मुंबईतील रुग्णदुपटीचा कालावधी आता ८५८ दिवसांवर गेला आहे.



हेही वाचा -

मुंबईत गुरुवारी कोरोनाचे नवीन ५४० रुग्ण

मुंबईत पावसाची हजेरी; मुंबईकरांना दिलासा


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा