Advertisement

मुंबईत बुधवारी दिवसभरात ८७१ करोनाबाधित

मुंबईमध्ये बुधवारी ८७१ कोरोनाबाधित आढळले, तर १६ रुग्णांचा मृत्यू झाला.

मुंबईत बुधवारी दिवसभरात ८७१ करोनाबाधित
SHARES

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असला नागरिकांच्या सुरक्षेसाठी महापालिका विषेश प्रयत्न करत आहे. मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आणण्यााठी महापालिकेनं मागील काही दिवसांपासून कोरोना चाचणीचं प्रमाण वाढवलं आहे. दिवाळीच्या काळाच चाचण्यांची संख्या घटली होती. परंतू, आता पुन्हा चाचण्या वाढविण्यात येणार आहेत. दरम्यान, मुंबईमध्ये बुधवारी ८७१ कोरोनाबाधित आढळले, तर १६ रुग्णांचा मृत्यू झाला.

दिवाळीनंतर रुग्णसंख्या वाढेल अशी शक्यता असल्यामुळं बुधवारी रुग्णसंख्या किती असेल याकडं लक्ष लागले होते. मागील २ दिवसांत ४०० ते ५०० रुग्ण आढळत होते, तर बुधवारी या रुग्णसंख्येत काहीशी वाढ झाली. लोकांशी सगळ्यात जास्त संपर्क ज्यांचा येतो अशा क्षेत्रातील व्यक्तींच्या चाचण्या वाढवण्यात येणार आहेत.

मंगळवारी ११ हजाराहून अधिक चाचण्या करण्यात आल्या. मात्र त्यापैकी ८७१ रुग्ण बाधित आढळले आहेत. पुढील काही दिवस केल्या जाणाऱ्या चाचण्यांपैकी किती रुग्ण बाधित आले त्यावर (पॉझिटिव्हिटी रेट) लक्ष ठेवलं जाणार आहे. मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याच्या कालावधी ३०० दिवसांच्या पुढे गेला आहे. सरासरी कालावधी ३२० दिवसांवर गेला आहे. तर एके काळी अतिसंक्रमित म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भायखळा, माझगावमध्ये हाच कालावधी ८०० दिवसांवर गेला आहे.

आतापर्यंत मुंबईत १७ लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. दिवाळीनंतर या चाचण्यांमध्ये अजून वाढ होईल. मुंबईतील एकूण रुग्णांपैकी ९१ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर सध्या केवळ ८,६५८ रुग्ण उपचाराधीन आहेत.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा