Advertisement

मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी ३९२ दिवसांवर

मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. त्यामुळे रुग्ण दुपटीच्या कालावधीत पुन्हा एकदा सुधारणा झाली आहे.

मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी ३९२ दिवसांवर
SHARES

मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. त्यामुळे रुग्ण दुपटीच्या कालावधीत पुन्हा एकदा सुधारणा झाली आहे. मुंबईतील कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी आता ३९२ दिवसांवर पोहोचला आहे.  

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात येऊ लागली आहे. मुंबईत रविवारी ५३० नवीन रुग्ण आढळले. तर सात रुग्णांचा मृत्यू झाला.  ७१५ रुग्ण रविवारी बरे  झाले आहेत. आतापर्यंत ३ लाख २७५३ मुंबईकरांना कोरोनाची लागण झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्क्यांवर  पोहोचले असून आतापर्यंत दोन लाख ८३ हजार ८५० रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत ११ हजार २४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विविध रुग्णालयांमध्ये ६ हजार ७७२ रुग्ण उपचार घेत आहेत.

मुंबईतील कोरोना वाढीचा दर ०.२१ टक्क्यावर स्थिर आहे. आतापर्यंत मुंबईत २५ लाख ९६ हजार ७९० चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईतील प्रतिबंधित क्षेत्राची संख्या १३१ झाली आहे. तर दोन हजार ३२६ इमारती सील केल्या आहेत. 



हेही वाचा -

सीएसएमटीच्या पुनर्विकासासाठी 'या' कंपन्या इच्छुक

वाहतूक पोलिसांच्या गणवेशावर लावले जाणार कॅमेरे



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा