मागील काही दिवसांपासून ठाणे महापालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याचं दिसून येत आहे. रोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या घटली आहे. त्यामुळे पालिका क्षेत्रातील रुग्ण दुपटीचा कालावधी तब्बल ४२८ दिवसांवर गेला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत कोरोनाचे ५४ हजार ४५० करोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ५२ हजार ३८८ (९६.२१ टक्के) रुग्ण बरे झाले आहेत. तर १ हजार २३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ८२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पालिकेकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजना आणि रुग्ण संख्या घटल्यानंतरही चाचण्यांची संख्या कमी न केल्याने कोरोनाचा फैलाव रोखण्यात यश आलं आहे.
ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आल्यानंतर महापालिका यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. रुग्ण संख्या कमी झाली तरी पालिका प्रशासनाने चाचण्यांची संख्या कमी केलेली नाही. पालिका क्षेत्रात रोज साडेपाच हजार चाचण्या केल्या जात आहेत. यामध्ये सरासरी शंभरच्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत. आतापर्यंत शहरात ७ लाख ९३ हजार ७९५ चाचण्या झाल्या आहेत. त्यामध्ये रुग्ण आढळण्याचे प्रमाण ६.८६ इतके आहे.
मुंबई लोकलमध्ये होणार 'कोरोना'बाबत जनजागृती
जाहिरातींमध्ये मराठी भाषेचा वापर अनिवार्य; मनसेची पत्राद्वारे पश्चिम रेल्वेकडे मागणी