Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
55,601
3,028
Maharashtra
6,39,075
62,194

पालघर हत्याकांडातील ११ आरोपींना कोरोनाची लागण

पालघर येथील गडचिंचले गावात जमावाकडून झालेल्या साधू हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या ११ आरोपींना कोरोनाची लागण झाली आहे.

पालघर हत्याकांडातील ११ आरोपींना कोरोनाची लागण
SHARES

पालघर येथील गडचिंचले गावात जमावाकडून झालेल्या साधू हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या ११  आरोपींना कोरोनाची लागण झाली आहे. आरोपींना वाडा पोलीस स्थानकात ठेवण्यात आलं आहे. आरोपींचे कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने वाडा पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे वाडा पोलीस ठाणे व बाजूलाच असलेले तहसीलदार कार्यालय दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहे.

गडचिंचले गावातील २३ आरोपींना वाडा पोलीस ठाण्याच्या कोठडीत ठेवण्यात आलं आहे. यापैकी ११ आरोपींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आणखी ६ आरोपींचे स्वॅब तपासणीसाठी देण्यात आले आहेत. त्याचा चाचणी अहवाल अद्याप आलेला नाही.  एका आरोपीचा कोरोना चाचणी अहवाल २ मे रोजी पॉझिटिव्ह आला होता. आणखी ११ आरोपांना करोनाची लागण झाल्याने वाडा शहरात सगळेच हादरले आहेत.

काय आहे प्रकरण?

पालघरमधील गडचिंचले गावात २ साधू आणि त्यांच्या चालकाची जमावाने हत्या केली होती. १७ एप्रिल रोजी दाभाडी-खानवेल मार्गावरून हे तिघेही आपल्या कारमधून नाशिकच्या त्र्यंबकेश्वरकडे जात होते. यावेळी शेकडो ग्रामस्थ रस्त्यावर जमा झाले. त्यांनी ही कार थांबवत प्रवाशांची विचारपूस करण्यास सुरुवात केली. मात्र प्रवाशांनी माहिती देण्याच्या आधीच काही लोकांनी गाडीच्या दिशेने दगडफेक सुरू केली. त्यानंतर या जमावाने कारमधील तिघांनाही चोर समजून लाठ्याकाठ्यांनी बेदम चोप दिला आणि त्यांना दगडाने ठेचून मारलं. हे प्रकरण चिघळल्यावर आरोपी जंगलात लपून बसले हाेते. पोलिसांनी जंगलात जाऊन 110 आरोपींना अटक केली होती. यामध्ये ९ अल्पवयीन आरोपींचाही समावेश आहे.हेही वाचा -

मुंबईत २ दिवस मुसळधार पावसाची शक्यता

कस्तुरबामध्ये आता प्रतिदिन ७०० ते ८०० चाचण्यांची सुविधा
Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा