Advertisement

Coronavirus Updates: जसलोक रुग्णालयातील २१ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण

जसलोक रुग्णालयातील २१ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Coronavirus Updates: जसलोक रुग्णालयातील २१ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण
SHARES

कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्यानं वाढ होत आहे. मुंबईतील रुग्णांची संख्याही राज्यातील एकूण रुग्णांच्या संख्येपैकी अर्ध्याहून जास्त आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असताना जसलोक रुग्णालयातील २१ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. याबाबत जसलोक रुग्णालय प्रशासनानं मंगळवारी माहिती दिली आहे.

जसलोक रुग्णालयातील रुग्णालयामधील एक नर्स संसर्ग झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आली असून, इतर कुणाही वैद्यकीय कर्मचाऱ्याला वा नर्सला कोरोनाची लागण झालेली नाही, असा रुग्णालय प्रशासनानं दावा केला होता. परंतु, हा दावा आता खोटा ठरल्याची माहिती मिळते. संसर्ग झालेल्या नर्सना रातोरात सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आलं. तसंच कस्तुरबा रुग्णालयामध्ये त्यांच्या कोरोनासाठी तपासण्याही करण्यात आल्या.

मंगळवारी जसलोकनं रुग्णालयातील २१ वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट केलं आहे. रुग्णालय प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, ९८४ कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यापैकी २१ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामध्ये परिचारिकांचाही समावेश आहे. यातील १६ जणांना सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलं आहे.



हेही वाचा -

भाभा रुग्णालयातील कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू

वरळीकरांना कोरोना करतोय टार्गेट



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा