मुंबई - डॉक्टरांच्या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत निवेदन सादर केले. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदनातून आपला संताप व्यक्त केला. "सुरक्षेचे आश्वासन देऊनही डॉक्टर कामावर रुजू होण्यास तयार नाहीत. राज्याचा मुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री त्यांना कामावर रुजू होण्यासाठी विनवणी करतात, तरीही ते कामावर रुजू होण्यास तयार नाहीत. आणखी किती संयम ठेवायचा? इनफ इज इनफ," असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी संताप व्यक्त केला. "डॉक्टर्सना घेतलेली शपथ लक्षात असेल तर डॉक्टर्सने आपली भूमिका बदलावी. राज्य सरकार हातावर हात ठेऊन बसणार नाही. योग्य कारवाई करणार. जर आज डॉक्टर कामावर रुजू झाले नाहीत तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल," असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.
"डॉक्टरांवर हल्ला करणे चुकीचे असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले. जखमी झालेल्या डॉक्टरवर उपचार मोफत केले जाणार आहेत," असेही त्यांनी सांगितले. बंदूकधारी सुरक्षा रक्षक तैनात करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रुग्णाल्याच्या सुरक्षाचे ऑडिट करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
राज्य सरकार हतबल - गिरीष महाजन
विधानसभेमध्ये वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी निवेदन देताना सांगितले की, "निवासी डॉक्टर्सचे प्रतिनिधी बैठकीनंतर समाधानी आहेत असे सांगतात. पण संपाचे समर्थन करतात. त्यांच्यामध्ये एकमत नाही आहे. निवासी डॉक्टरांना लेखी आश्वासन दिले आहे तरी निवासी डॉक्टर्सं ऐकायला तयार नाहीत. निवासी डॉक्टर्स हायकोर्टाचे आणि राज्य सरकारचे ऐकत नाही," अशा परिस्थितीमुळे राज्य सरकार हतबल झाले आहे.
आणखी वाचा
पाचव्या दिवशीही डॉक्टरांचे आंदोलन सुरूच
https://www.mumbailive.com/mr/city/resident-doctors-continues-the-protest-for-the-fifth-day-9484