Advertisement

मुंबईकरांना आता घराजवळच मिळणार कोरोना लस; महापालिकेचा केंद्राला प्रस्ताव

नागरिकांना घराजवळच कोरोनावरील लस मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईकरांना आता घराजवळच मिळणार कोरोना लस; महापालिकेचा केंद्राला प्रस्ताव
SHARES

कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. या वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी मुंबईत लसीकरण सुरू आहे. अशातच आता नागरिकांना घराजवळच कोरोनावरील लस मिळणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नागरिकांना घराजवळ कोरोना लसीकरणाची (corona vaccination) सोय उपलब्ध करून देण्याचा मुंबई महानगरपालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी केंद्र सरकारची (Union Govt) परवानगी मिळणं आवश्यक असून महानगरपालिकेनं यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला आहे.

या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास मुंबईकरांना आपल्या घराशेजारी लसीकरणाची सोय उपलब्ध होणार आहे. ही माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. ३१ मे पर्यंत लसीलकरण पूर्ण करण्याचं पालिकेनं लक्ष्य ठेवलं आहे. मुंबईत सध्या होत असलेल्या कोविड चाचण्यांची संख्या दररोज सरासरी ४० ते ४५ हजार इतकी आहे. मात्र, मुंबईत कोरोनाची होणारी झापाट्यानं होणारी वाढ लक्षात घेत मुंबईत दररोज १ लाख कोरोना चाचण्या घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिले आहेत.

सर्वसामान्य नागरिकांचं लसीकरण वेगात व्हावं यासाठी नगरसेवक आणि सामाजिक संस्थांची मदत घेऊन लसीकरणाचा वेग वाढविण्याचा प्रयत्न पालिका करणार आहे. आता ४५ वर्षांपर्यंतच्या सर्व नागरिक लस घेण्या पात्र आहेत. तसा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. सध्या ४५ ते ६० वर्षांमधील इतरही आजार असलेल्या नागरिकांना तसेच ज्येष्ठ नागरिकांना लशीचा डोस दिला जात आहे. मुंबईत सध्या १०० ठिकाणी लसीकरण सुरू आहे. 

मुंबईत ४५ वर्षावरील सदृढ गटातील नागरिकांची संख्या सुमारे ४० लाख इतकी आहे. दरम्यान, ४५ वर्षांपुढील सर्वांना लस देण्याची मुंबई महापालिकेची तयारी असल्याची माहिती महापालिकेनं दिली आहे. त्यासाठी तेवढ्या प्रमाणात लशीचा साठाही महापालिकेकडं उपलब्ध असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी दिली.

मुंबई महानगरपालिकेने लसीकरणाचा वेग वाढवण्याची योजना आखली आहे. त्यासाठी महानगरपालिका आता दोन पाळ्यांमध्ये लसीकरण सुरू करणार आहे. पहिली पाळी सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत असेल, तर दुसरी पाळी दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत असणार आहे.हेही वाचा -

मुंबईत कोरोनाचा उद्रेक, बुधवारी ५ हजार नवे रुग्ण

मुंबईत यापुढे देशी झाडांचीच लागवड होणार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा