Advertisement

मुंबईत कोरोनाचा उद्रेक, बुधवारी ५ हजार नवे रुग्ण

मुंबईत रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने लाॅकडाऊन लावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, लॉकडाऊन लावलं जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका पालिकेने घेतली आहे.

मुंबईत कोरोनाचा उद्रेक, बुधवारी ५ हजार नवे रुग्ण
SHARES

मुंबईत आता कोरोना उद्रेक झाल्याचं दिसून येत आहे. बुधवारी मुंबईत तब्बल ५ हजार ६७ नवीन रुग्ण आढळले आहेत. मुंबईतील ही आजवरची सर्वोच्च रुग्णवाढ आहे. मागील अऩेक दिवसांपासून रुग्णसंख्या वाढतच चालल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. 

मंगळवारी मुंबईत ३ हजार ५१२ नवीन रुग्ण आढळले. त्यानंतर बुधवारी हा आकडा पाच हजारांच्या वर गेला. मुंबईत एकूण ५ हजार ४४४ नवीन रुग्ण आढळले. त्यातील २२८ रुग्ण आयसीएमआरच्या यादीत दुबार आढळले तर १४९ रुग्ण मुंबई बाहेरचे आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांमध्ये निव्वळ मुंबईतील ५ हजार ६७ रुग्ण असल्याचेंपालिकेकडून सांगण्यात आलं.

दरम्यान, मुंबईत करोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. बुधवारी पालिकेकडून ४७ हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. रुग्णसंख्या वाढण्याचे ते एक प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. पुढील काही दिवसांत मुंबईत दररोज ५० हजार चाचण्यांचे उद्दीष्ट ठेवण्यात आल्याचंही पालिका प्रशासनाने सांगितलं आहे.

मुंबईत रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने लाॅकडाऊन लावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, लॉकडाऊन लावलं जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका पालिकेने घेतली आहे. मुंबईत लॉकडाऊन होणार नाही, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी अगदी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे. 

तसंच लोकलवर कोणतेही निर्बंध आणण्याचा विचार नसल्याचं काकाणी यांनी स्पष्ट केलं. मुंबईत कोविड विषयक नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यावर तसेच चाचण्यांची संख्या वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.हेही वाचा -

मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये १४२ टक्के वाढ

  1. मॉल, उद्याने, बाजारांसाठी नवी मुंबई पालिकेची नवीन नि‍यमावली
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा