Advertisement

मॉल, उद्याने, बाजारांसाठी नवी मुंबई पालिकेची नवीन नि‍यमावली

महापालि‍का आयुक्त अभि‍जीत बांगर यांनी मॉल्स, डि‍पार्टमेंटल स्टोअर्स, उद्याने, बाजार अशा गर्दीच्या संभाव्य ठि‍काणी कोव्हीड सुरक्षा नि‍यमांचे काटेकोर पालन व्हावे व कोव्हीड प्रादुर्भावाला प्रति‍बंध व्हावा यासाठी नवीन नि‍र्बंध जाहीर केले आहेत.

मॉल, उद्याने, बाजारांसाठी नवी मुंबई पालिकेची नवीन नि‍यमावली
SHARES

मागील काही दि‍वसांपासून नवी मुंबईत कोरोना रुग्णसंख्येमध्ये मोठी वाढ झाली आहे. कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी नवी मुंबई महानगरपालि‍केच्या वतीने पुन्हा अधि‍क प्रभावीपणे मि‍शन ब्रेक द चेन राबवि‍ण्यात येत आहे. यादृष्टीने वि‍वि‍ध उपाययोजना करताना महापालि‍का आयुक्त अभि‍जीत बांगर यांनी मॉल्स, डि‍पार्टमेंटल स्टोअर्स, उद्याने, बाजार अशा गर्दीच्या संभाव्य ठि‍काणी कोव्हीड सुरक्षा नि‍यमांचे काटेकोर पालन व्हावे व कोव्हीड प्रादुर्भावाला प्रति‍बंध व्हावा यासाठी नवीन नि‍र्बंध जाहीर केले आहेत.

सार्वजनि‍क बगीचे, उद्याने, पार्क यामध्ये वि‍शेषत्वाने संध्याकाळी अनेक कुटूंबे मास्कशि‍वाय वावरत असल्याचे आढळून येत आहे. त्यामध्येही लहान मुलांना खेळणी, व्यायाम साहि‍त्य यांच्या वारंवार हाताळणीमुळे कोव्हीड संसर्ग होण्याचा धोका अधि‍क होऊ शेकतो. त्यामुळे सदर नि‍र्बंध लागू करण्यात आल्याचं पालिकेने म्हटलं आहे. 

यापेक्षा अधि‍क तीव्र नि‍र्बंध लावण्याची वेळ येऊ नये यासाठी प्रत्येक नागरि‍काने घरातून बाहेर पडल्यापासून घरी परत येईपर्यंत न चुकता मास्कचा वापर करावा व प्रत्येक ठि‍काणी सुरक्षि‍त अंतराचे भान राखावे तसेच शक्य होईल ति‍तक्या वेळा हात धुवावेत अथवा सॅनि‍टायझरचा वापर करावा असं आवाहन महापालि‍का आयुक्त अभि‍जीत बांगर यांनी केलं आहे.

हे आहेत नवीन नियम

- शॉपिंग मॉल्सच्या प्रत्येक प्रवेशव्दारावर दर शुक्रवारी सायंकाळी ४ नंतर तसंच शनि‍वार आणि‍ रवि‍वार पूर्ण वेळ मॉलमध्ये प्रवेश देताना प्रत्येकाची कोव्हीड चाचणी (Rapid Antigen Test) करणं बंधनकारक असणार आहे. कोव्हीड चाचणीचा अहवाल नि‍गेटीव्ह असेल तरच मॉलमध्ये प्रवेश देण्यात येईल किंवा मॉलमध्ये येणाऱ्याने मागील ७२ तासांमधील कोव्हीड चाचणी (RT-PCR) अहवाल नि‍गेटीव्ह असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्याशि‍वाय मॉलमध्ये प्रवेश दि‍ला जाणार नाही.

- शॉपिंग मॉलमध्ये योग्य सामाजि‍क अंतर न पाळता मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे आढळल्यास प्रत्येक वेळी ५० हजार रुपये दंड मॉल व्यवस्थापनाकडून वसूल केला जाईल. दोन वेळा दंड आकारला गेल्यास व ति‍सऱ्यांदा पुन्हा उल्लंघन होत असल्याचे नि‍दर्शनास आल्यास शॉपिंग मॉल पूर्णत: बंद करण्याची कारवाई करण्यात येईल.

- डी मार्ट, रि‍लायन्स फ्रेश, स्टार बाजार यांसारख्या मोठ्या स्टोअर्समध्ये एका वेळी कि‍ती लोक उपस्थि‍त राहू शकतील याचा आराखडा तयार करुन त्यानुसार टोकन प्रणाली सुरु करण्यात यावी.

- या स्टोअर्समध्ये योग्य सामाजि‍क अंतर न पाळता मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्याचे आढळल्यास प्रत्येक वेळी रुपये ५० हजार रुपये दंड संबंधित स्टोअर्सच्या व्यवस्थापनाला केला जाईल. दोन वेळा दंड आकारला गेल्यास व ति‍सऱ्यांदा पुन्हा उल्लंघन होत असल्याचे नि‍दर्शनास आल्यास स्टोअर पूर्णत: बंद करण्याची कारवाई करण्यात येईल.

- कोव्हीड १९ वि‍षाणूचा प्रसार रोखण्यासाठी उद्यानांमधील ओपन जीम, ग्रीन जीम, खेळाचे साहि‍त्य हे पूर्णत: बंद राहतील व त्यांचा वापर करता येणार नाही.

- सर्व उद्याने सकाळी ५.३० ते सकाळी १० या वेळेव्यतिरिक्त इतर संपूर्ण वेळ बंद राहतील.

 - दैनंदिन व आठवडी बाजारामध्ये मास्क, सुरक्षि‍त अंतर अशा कोव्हीड सुरक्षा नि‍यमांचे काटेकोर पालन केले जाणे अनि‍वार्य आहे.

- मॉल, डि‍पार्टमेंटल स्टोअर्स किंवा उद्याने अशा ठिकाणी होणारी गर्दी व नागरि‍कांकडून मास्क, सुरक्षि‍त अंतर अशा कोव्हीड सुरक्षा नि‍यमांचे होणारे उल्लंघन यामुळे रुग्णवाढीचा दर अधि‍क वाढू शकतो.

 - शनि‍वारी, रवि‍वारी मॉलमध्ये होणारी गर्दी पाहता सुरक्षि‍त अंतराच्या नि‍यमाचे पालन होताना दि‍सून येत नाही. वास्तवि‍कत: मॉलमध्ये शनिवार, रविवार अशा आठवड्याच्या अखेरच्या दिवशी होणारी गर्दी आठवड्यातील इतर दिवशी विखुरली जाणे अपेक्षित आहे, जेणेकरून मॉलमधील उपस्थितीचे योग्य नियोजन होऊन सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन होईल.

 


हेही वाचा -

मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये १४२ टक्के वाढ

  1. राज्यात मंगळवारी १३२ रुग्णांचा मृत्यू, २८,६९९ नवे रुग्ण
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा