इमानचं 120 किलो वजन घटलं!

 Saifee Hospital
इमानचं 120 किलो वजन घटलं!

मुंबई - इजिप्तवरून आलेल्या इमानवर पहिली शस्त्रक्रिया मंगळवारी करण्यात आली. इमानवर लॅप्रोस्कोपिक स्लिव्ह ग्रॅस्ट्रिक्टोमी नावाची सर्जरी करण्यात आली असून या शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या पोटावरील त्वचेचा अतिरिक्त भाग काढून टाकला जातो. या शस्त्रक्रियेसाठी इमानचे वजन कमी करणे गरजे होते. त्यानुसार रुग्णालयात दाखल झाल्यापासून इमानचे शस्त्रक्रियेविना 120 किलो वजन घटले. शस्त्रक्रियेनंतर इमानची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ. मुफज्जल लकडावाला यांनी दिली. चर्नीरोडच्या सैफी रूग्णालयात इमानवर उपचार सुरु आहेत..

दुसऱ्या शस्त्रक्रियेनंतर 25 दिवसांत इमानचे आणखी 50 किलो वजन कमी होईल, अशी माहिती डॉ. मुफ्फजल लकडावाला यांनी दिली.

इजिप्तहून सर्जरीसाठी भारतात दाखल झालेल्या 36 वर्षीय इमानचे वजन आता 380 किलो एवढे आहे. इमानला डॉक्टरांनी दिलेले पथ्य पाळावे लागत आहे. मात्र, ती मुंबईत दाखल झाल्यावर सातत्याने उपचारांना सकारात्मक प्रतिसाद देत आहे. त्यामुळे आता वजन कमी झाल्यामुळे इमान स्वत: बसू लागली आहे. आता अजून वजन कमी झाले तर ती स्वत:च्या पायांवर उभी राहू शकेल. 


Loading Comments