सोरायसीसवर सीएनआर हर्ब्स वापरता? मग सावधान !

  Pratiksha Nagar
  सोरायसीसवर सीएनआर हर्ब्स वापरता? मग सावधान !
  मुंबई  -  

  सायन- सोरायसीस आजार सीएनआर हर्ब्स या औषधाद्वारे पूर्णपणे बरा होऊ शकतो डॉ. सी. एन. राजादुराई यांनी केलेला दावा फोल ठरला आहे. अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए)ने नुकत्याच केलेल्या कारवाईतून समोर आले आहे. सायन येथील एस.आय.ई.एस कॉलेजजवळ डॉ. राजादुराई यांचे सीएनआर हर्ब्स क्लिनिक आहे. या क्लिनिकमध्ये सोरायसीसवर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारी सीएनआर हर्ब्स ही औषधे विना लेबल विकली जात असल्याची माहिती एफडीएला मिळाली होती. त्यानुसार एफडीएच्या अधिकाऱ्यांनी या क्लिनिकवर धाड टाकल्यानंतर उत्पादनातील घटक, उत्पादकाचे नाव, पत्ता औषधांमधील घटक अशी कुठलीही माहिती औषधांवर नसल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे तेथील सीएनआर हर्ब्सचा साडेचार लाखांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक चौकशी केली असता ही औषधे बोगस असल्याचेही म्हटले जात आहे. त्यामुळे सोरायसीससारख्या गंभीर आजारावर सीएनआर हर्ब्ससारखी औषधे घेणाऱ्यांना आता सावध होण्याची गरज आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.