Advertisement

कोविशील्‍ड लसीची अंतिम चाचणी लवकरच, सीरमकडून घोषणा

सध्या आयसीएमआर आणि सीरम देशातील वेगवेगळ्या १५ केंद्रांवर २-३ क्लिनिकल ट्रायल पूर्ण करत आहेत. तिसऱ्या चाचणीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत १६०० स्वयंसेवकांनी नोंदणी केली आहे.

कोविशील्‍ड लसीची अंतिम चाचणी लवकरच, सीरमकडून घोषणा
SHARES

पुण्यातील सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया  आणि इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ने गुरूवारी कोविशील्‍ड या कोरोना लसीच्या वैद्यकीय चाचणीच्या तिसऱ्या आणि अंतिम चाचणीची घोषणा केली आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

कोरोनावरील कोविशील्‍ड ही लस भारतात आयसीएमआर आणि सीरम अमेरिकेच्या नोवावॅक्सच्यावतीने विकसित करत आहेत. या दोन्ही संस्था कोवोवॅक्सच्या वैद्यकीय चाचण्यांसाठी आणि संशोधनासाठी देखील एकत्र काम करत आहेत. सीरम या चाचण्यांची प्रक्रिया राबवत आहे. 

सध्या आयसीएमआर आणि सीरम देशातील वेगवेगळ्या १५ केंद्रांवर २-३ क्लिनिकल ट्रायल पूर्ण करत आहेत. तिसऱ्या चाचणीसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत १६०० स्वयंसेवकांनी नोंदणी केली आहे.  तिसऱ्या वैद्यकीय चाचण्यांमध्ये आलेल्या निष्कर्षांनुसारच आयसीएमआरच्या मदतीने सीरम कोरोना लशीचं उत्पन्न सुरु करेल. भारतात आतापर्यंत कोणत्याही लसीला मंजूरी मिळालेली नाही. मात्र, तरीही सीरम इन्स्टिट्युटने ४ कोटी लशींचं उत्पादन केलं आहे.



हेही वाचा -

लसीकरणाच्या माहिती संकलनासाठी 'ॲप'

मुंबईसह राज्यातील किमान तापमानात घट



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा