Advertisement

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांचा संप अखेर मागे

अखेर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या मागण्यांची पूर्तता करण्याची ग्वाही दिल्यानंतर संप मागे घेतला.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांचा संप अखेर मागे
SHARES

मुंबईसह राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी १ ऑक्टोबर रोजी संपाची हाक दिली होती. शैक्षणिक शुल्क माफीची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन देऊनही कार्यवाही न केल्यामुळे संतप्त झालेले राज्यभरातील निवासी डॉक्टर १ ऑक्टोबरपासून संपावर गेले होते. परंतू, अखेर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या मागण्यांची पूर्तता करण्याची ग्वाही दिल्यानंतर संप मागे घेतला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 'मार्ड' प्रतिनिधींबरोबर सोमवारी बैठक झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी ग्वाही दिली. दरम्यान, मागील ३ दिवस चर्चा होऊनही तोडगा न निघाल्यामुळं अखेर रविवारी मार्डनं अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सेवा बंद करून संप तीव्र करण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी मार्ड प्रतिनिधींना सोमवारी बैठकीसाठी बोलावले होते.

राज्यातील सर्व निवासी डॉक्टरांच्या कार्याचा सन्मान म्हणून सन्माननिधी देण्यात येईल. शैक्षणिक शुल्क माफी तांत्रिक कारणामुळे शक्य नसल्यामुळे तज्ज्ञासोबत चर्चा करून यावर निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत स्पष्ट केलं. मुंबई पालिकेच्या निवासी डॉक्टरांच्या टीडीएस माफीबाबत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृहात आवश्यक सुधारणा करण्यात येईल, असेही आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर अखेर ‘मार्ड’ने संप मागे घेत असल्याचे सोमवारी रात्री जाहीर केले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा