Advertisement

मुंबईत पहिले आंतरराष्ट्रीय कृत्रिम अवयव पुनर्रोपन केंद्र 'ओट्टोबॉक' सुरु


मुंबईत पहिले आंतरराष्ट्रीय कृत्रिम अवयव पुनर्रोपन केंद्र 'ओट्टोबॉक' सुरु
SHARES

भारतात कारकिर्दीची यशस्वी २० वर्षे पूर्ण केल्यानंतर, 'ओट्टोबॉक'ने 'एमएसजे अँड डब्ल्यू' या कृत्रिम अवयव उत्पादक कॉर्पोरेशनबरोबर भागीदारी केली आहे. ही कंपनी पुढील पाच वर्षांत समाजातील दुर्बल घटकांमध्ये ज्यांना आवश्यकता आहे, अशांसाठी तब्बल ६०,००० दर्जेदार कृत्रिम अवयांची निर्मिती करणार आहे. त्यामुळे भारतातील सर्वात गरजू तरुणांना याचा फायदा होईल, याच अपेक्षेने हे प्रयत्न केले जाणार आहेत.



भारतात पुनर्रोपनाच्या सुविधा वाढण्याची गरज आहे. ५४,३६,००० भारतीय शारीरिक हालचालींच्या आजारांनी ग्रस्त आहेत. यातील बहुसंख्य लोकांना उपलब्ध सुविधा मिळवणे अजिबात शक्य नाही.

गेल्या २० वर्षांत आम्हाला भारतात जे यश मिळाले, ते अभिमानास्पद आहे. भारत सरकारबरोबरच्या आमच्या भागीदारीमुळे भविष्यात देशातील सेवांमध्ये आम्ही महत्त्वाची भूमिका बजावू, असा आम्हाला विश्वास वाटतो.

प्रा. हांस जॉर्ज नेडर, अध्यक्ष, ओट्टोबॉक हेल्थकेअर

ओट्टोबॉक हे भारतात सादर करण्यात आलेले पहिले आंतरराष्ट्रीय दर्जाचे पुनर्रोपन केंद्र आहे. संपूर्ण सुसज्ज, सर्वोत्तम दवाखाने आणि २७ दवाखान्यांत राष्ट्रीय स्तरावरील प्रक्रिया केंद्रे याद्वारे आत्तापर्यंत १० हजार पेक्षा जास्त रूग्णांना लाभ झाला आहे.



हेही वाचा

मोनिका मोरेला पुन्हा मिळणार हात


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा