Advertisement

फिटइंडिया कॅम्पेन मुंबईत दाखल


फिटइंडिया कॅम्पेन मुंबईत दाखल
SHARES

मुंबई - संपूर्ण देशभरात पोषण आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी, माहिती पोहचवण्यासाठी सुरू असलेलं फिट इंडिया अभियान १४ नोव्हेंबरला मुंबईत दाखल झालं. आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री फग्गन सिंह कुलस्ते यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाला शिवसेनेचे संजय राऊतही उपस्थित होते.

आहारतज्ज्ञ शिक्षक, नेते एकत्र येऊन या अभियानाचा हेतू सफल करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हे अभियान मुंबई, बंगळुरू, कोलकाता, ठाणे, चंडिगड, अमृतसर, पुणे, इंदोर, गुरूग्राम, गुवाहटी, अहमदाबाद, चेन्नई अशा या १२ शहरांत चालवलं जाणार आहे. सध्या भारतात पोषण आणि फिटनेसबाबत अनेक समस्या भेडसावत आहेत. नागरिकांना या बाबत योग्य ती माहिती देऊन जागरूक करणे गरजेचं आहे, त्यासाठी जीपीएन इंडियानं हाती घेतलेल्या या अभियानाचा अभिमान वाटतो, असं ग्लेनबिया स्पोर्टस् न्युट्रिशनचे सीईओ ह्युगो मँकगिरी यांनी सांगितले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा