साथीच्या रुग्णांमुळे देसाई रुग्णालय हाऊसफुल्ल

 Santacruz
साथीच्या रुग्णांमुळे देसाई रुग्णालय हाऊसफुल्ल
साथीच्या रुग्णांमुळे देसाई रुग्णालय हाऊसफुल्ल
साथीच्या रुग्णांमुळे देसाई रुग्णालय हाऊसफुल्ल
See all

सांताक्रूझ - सध्या साथीच्या रोगांनी मुंबईत डोकं वर काढलं आहे. सांताक्रूझ पूर्वेकडील व्ही. एन. देसाई पालिका रुग्णालय तर साथीच्या रुग्णांनी हाऊसफुल्ल झालंय. वांद्रे , खार, वाकोला, कलिना भागातील रुग्ण उपचार घेण्यासाठी मोठ्या संख्येने या रुग्णालयात दाखल झालेत. रुग्णालयातून मिळालेल्या आकडेवारीनुसार दाखल झालेल्या रुग्णांत तापाचे - ७५, डेंग्यूचे - १२, गॅस्ट्रो - 1, लेप्टोस्पायरोसिस - 3, मलेरिया - 3 जण आहेत. या रुग्णसंख्येत दररोज भर पडत असल्यानं रुग्णसेवेवर कमालीचा ताण पडत असल्याचं रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आलं.

Loading Comments