सर्व औषधांच्या किंमतीवरुन जीएसटी कमी करा- एफएमआरआयएची मागणी

  Mumbai
  सर्व औषधांच्या किंमतीवरुन जीएसटी कमी करा- एफएमआरआयएची मागणी
  मुंबई  -  

  सरकारने औषधांच्या किंमतीवरही जीएसटी लागू केला. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसतो, याच गोष्टीच्या निषेधार्थ ‘फेडरेशन ऑफ मेडिकल अॅण्ड रिप्रेंझेटटिव्हस असोसिएशन ऑफ इंडिया’ या संघटनेने सोमवारी आझाद मैदानात रॅली मोर्चाचं आयोजन केलं होतं. या रॅली मोर्चात जवळपास भारतातून 15 हजार आणि महाराष्ट्रातून 3 हजार विक्री आणि वैद्यकीय प्रतिनिधी सहभागी झाले होते.

  हा मोर्चा प्रमुख 4 मागण्यांसाठी आयोजित करण्यात आला होता.

  केंद्र सरकारने सर्व औषधांवरील जीएसटी कमी केलं पाहिजे.
  जेनेरिक औषधांऐवजी हाथी कमिटीच्या प्रस्तावाप्रमाणे प्रोडक्शन दरापेक्षा 100 टक्के नफा देऊन कमी दरात रुग्णांना औषधे मिळावीत.
  अवैधरित्या सुरू असलेल्या ऑनलाईन औषधविक्रीवर आळा घालावा.
  केंद्र आणि राज्य सरकारने वैद्यकीय प्रतिनिधींसाठी जे कायदे केले आहेत त्यांची अंमलबजावणी करावी.

  याविषयी, महाराष्ट्र विधी व वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेचे जनरल सेक्रेटरी श्रीकांत फोपसे यांच्याशी चर्चा केली असता, “ आपण याआधीही 3 फेब्रुवारीला संप केला होता. तसंच नोव्हेंबरमध्ये जंतरमंतरवर आंदोलन केलं होतं. आम्ही या गोष्टीसाठी सतत पाठपुरावा करत आहोत.” असं सांगितलं.


  यासंदर्भात शिष्ट मंडळ प्रिन्सिपल सेक्रेटरी लेबर राजेंद्र कुवत यांच्याशी आमची चर्चा झाली. त्यांनी या संदर्भात आम्हाला आश्वासन दिलं आहे की, या गोष्टीचा पाठपुरावा करु असं सांगितलं आहे. तसंच, यापुढे या आमच्या मागण्यांना गंभीरतेने नाही घेतलं तर वैद्यकीय पद्धतीने आणखी तीव्र आंदोलन करुन आम्ही यासाठी रस्त्यावर उतरु.

  श्रीकांत फोपसे,महाराष्ट्र विधी व वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेचे जनरल सेक्रेटरी

   


  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.