Advertisement

५ महिन्यानंतर मुंबईत प्रथमच कोरोना मृतांचा आकडा ३ वर

मुंबईत आतापर्यंत ७,१५,३८९ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील सरासरी रिकव्हरी रेट ९७ टक्के झाला आहे.

५ महिन्यानंतर मुंबईत प्रथमच कोरोना मृतांचा आकडा ३ वर
SHARES

मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आता दिवसेंदिवस घटत चालली आहे. सोमवारी मुंबईत कोरोनाचे अवघे २१८ नवे रुग्ण आढळले.  तर ३७२ रुग्ण बरे झाले आहेत. तसंच एप्रिलनंतर एका दिवसात सर्वात कमी आणि या महिन्यात दुसऱ्यांदा मृतांचा आकडा ३ वर गेला आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत १५ हजार ९४२ जणांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

मुंबईत आतापर्यंत ७,१५,३८९ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईतील सरासरी रिकव्हरी रेट ९७ टक्के झाला आहे. मुंबईतील रुग्णवाढीचा साप्ताहिक दर हा राज्याच्या सरासरीपेक्षा कमी नोंदवण्यात आला आहे. मुंबईचा हा दर ०.०२ टक्के इतका आहे. तर राज्याचा साप्ताहिक रुग्णवाढीचा दर ०.१० टक्के आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासून सोमवारसह तिसऱ्यांदा एका दिवसातील रुग्णसंख्या ३०० पेक्षा कमी नोंदवली गेली आहे. 

मुंबईत २ ते ८ ऑगस्ट या काळात कोरोना रुग्णसंख्येतील वाढ ०.०४ टक्के होती. झोपडपट्टी आणि चाळ यासारख्या ठिकाणी असलेल्या नियंत्रण क्षेत्रांची संख्या घटून केवळ एक झाली आहे. तर सील केल्या गेलेल्या इमारतींची संख्या ४५ आहे. ४ एप्रिलला मुंबईत सर्वाधिक ११,१६३ आणि १ फेब्रुवारीला सर्वात कमी ३२८ रुग्ण नोंदवले गेले होते.

मुंबईमध्ये लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ही एक हजार ४४० इतकी असून लक्षणे असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दोन हजार २८४ इतकी नोंदवण्यात आली आहे. अत्यवस्थ असलेले ४७२ रुग्ण मुंबईमध्ये आहेत. तर आजवर करोनातून मुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या सात लाख १४ हजार ६३९ एवढी आहे. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा