Advertisement

डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांना वेळेत पगार नाही, केंद्राची सुप्रीम कोर्टाला माहिती

महाराष्ट्र सरकारनं डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना वेळेत पगार दिला नसल्याची माहिती केंद्रानं सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे.

डॉक्टर्स, आरोग्य कर्मचाऱ्यांना वेळेत पगार नाही, केंद्राची सुप्रीम कोर्टाला माहिती
SHARES

देशभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. रुग्णांची संख्या सातत्यानं वाढताना दिसत आहे. अशा वेळी कोरोना रुग्णांना बरे करण्यासाठी डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचारी रात्रंदिवस झटत आहेत. मात्र असं असतानाही महाराष्ट्र सरकारनं डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना वेळेत पगार दिला नसल्याची माहिती केंद्रानं सर्वोच्च न्यायालयाला दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयानं ही माहिती देत महाराष्ट्रासोबत पंजाब, त्रिपुरा आणि कर्नाटक यांचाही उल्लेख केला आहे. त्यावरून सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला कोरोनाच्या लढाईत सहभागी आरोग्य कर्मचाऱ्यांचं वेतन वेळेत मिळेल याची काळजी घेण्याच्या सूचना केलेल्या आहेत.

हेही वाचा : मलबार हिल, नाना चौकमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्णवाढ

एका डॉक्टरनं याविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी पार पडली. याचिकाकर्त्यानं क्वारंटाइनमध्ये असल्यास त्या दिवसांमधील वेतन कपात केली जात असल्याची तक्रार केली होती. न्यायाधीश अशोक भूषण यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. यावेळी केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला ही माहिती दिली आहे.हेही वाचा

ठाण्यातील लाॅकडाऊन ३१ आॅगस्टपर्यंत वाढवला

मुंबईत ६१६ कंटेन्मेंट झोन, 'ही' आहे यादी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा