Advertisement

एनएससीआय, पोद्दार रुग्णालयात होणार मोफत कोरोना चाचणी

मुंबईत सध्या रोज साडेसात हजार कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत. पालिकेने आणखी चाचण्या वाढवण्याचं ठरवलं आहे.

एनएससीआय, पोद्दार रुग्णालयात होणार मोफत कोरोना चाचणी
SHARES

वरळी, प्रभादेवीतील रहिवाशांना आता एनएससीआय आणि पोद्दार रुग्णालयात कोरोनाची मोफत चाचणी करता येणार आहे. या दोन्ही रुग्णालयांंमध्ये मोफत चाचण्या करण्यास सुरुवात झाली आहे. 

मुंबईत सध्या रोज साडेसात हजार कोरोनाच्या चाचण्या केल्या जात आहेत. पालिकेने आणखी चाचण्या वाढवण्याचं ठरवलं आहे. मुंबईतील मृत्युदर जास्त असलेल्या नऊ विभागांत दर दिवशी ५०० चाचण्या करण्याचं लक्ष्य देण्यात आलं आहे. अन्य विभागांनाही चाचण्या वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार सर्वच विभागांनी मोफत चाचण्यांचं प्रमाण वाढवलं आहे. या अंतर्गत वरळी, प्रभादेवीचा भाग असलेल्या जी दक्षिण विभागाच्या एनएनसीआय करोना उपचार केंद्रात व पोद्दार रुग्णालयात मोफत चाचणीची व्यवस्था करण्यात आली आहे.  वरळी, प्रभादेवीतील रहिवाशांना येथे येऊन कोरोनाची मोफत चाचणी करता येणार आहे.

याशिवाय  लक्षणे असलेल्या ज्या रुग्णांना आपला अहवाल येईपर्यंत थांबता येईल असा प्रतीक्षा कक्षही पोद्दार व एनएससीआयमध्ये सुरू करण्यात आला आहे. अनेकदा रुग्णाला लक्षणे असली आणि अहवाल प्रलंबित असला की त्या रुग्णांच्या मनात शंका येतात. लहान घरात राहणाऱ्या अशा रुग्णांना वेगळं राहणंही अवघड असतं. तसंच ते बाधित असतील तर त्यांच्यापासून संसर्गाचा धोकाही असतो. त्यामुळे अशा अहवाल प्रलंबित असलेल्या रुग्णांना दाखल करण्यासाठी प्रतीक्षा कक्ष तयार करण्यात आला आहे. 



हेही वाचा -

मुंबईत कोरोनाचे ७४३ नवे रुग्ण, दिवसभरात २० जणांचा मृत्यू

राज्यात ११ हजार ०१५ नवे रुग्ण, दिवसभरात २१२ जणांचा मृत्यू



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा