मोतीबिंदू, नेत्र तपासणी शिबिर

 Ghatkopar
मोतीबिंदू, नेत्र तपासणी शिबिर
मोतीबिंदू, नेत्र तपासणी शिबिर
See all

विक्रोळी - विक्रोळी पार्कसाईट मधील १७ नंबर रोड येथे मोफत मोतीबिंदू आणि नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नगरसेवक हारुन खान यांच्या ऑफिसमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. स्वयं एज्युकेशन फाऊंडेशनच्या वतीनं या शिबिराचं आयोजित करण्यात आले होते. फाऊंडेशनच्या अध्यक्ष पूर्णिमा देसाईंच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. मोतीबिंदू आणि नेत्र तपासणीसाठी एकूण १०० जण सहभागी झाले होते. या शिबिरातद्वारे आर्थिक परिस्थितीने कमकुवत असलेल्या रुग्णांवर फाऊंडेशच्या वतीने मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. महात्मा हेल्थ एंड हॅप्पीनेस हॉस्पिटलमध्ये मोतीबिंदू झालेल्या रुग्णांवर शस्त्रक्रिया होणार आहे.

Loading Comments