देवनार - स्पंदन हॉलिस्टील या रुग्णालयात मधुमेह रुग्णालयासाठी मोफत मार्गदर्शन शिबीर आणि तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. एम.बी. बरवालिया फाउंडेशनतर्फे या शिबिराचे आयोजन केले आहे. परिसरातील दोनशेपेक्षा अधिक रुग्णांनी शिबिराचा लाभ घेतला. मधुमेहाचे दुष्परिणाम आणि त्यावरील उपाय यावर डॉ. शंकर चावला यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले. या ठिकाणी मोफत रक्त तपासणी, डोळे तपासणीही करण्यात आली.