'कामावर या नाहीतर पगार मिळणार नाही'

नरिमन पॉईंट - "आज रात्री 8 वाजेपर्यंत कामावर रुजू व्हा, नाहीतर सहा महिन्यांचा पगार कापला जाईल," असा इशारा राज्य सरकारने मार्डच्या डॉक्टरांना दिला आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी मार्डच्या डॉक्टरांना तंबी दिली आहे.

"डॉक्टर नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. त्यामुळे डॉक्टरांनी कामावर रुजू व्हावे. डॉक्टरांना सुरक्षा पुरवण्याचे आश्वासन दिले आहे. दिलेले आश्वासन एक महिन्यात पूर्ण करू," असेही त्यांनी स्पष्ट केले. पण तरीही डॉक्टर संप मागे घेण्यास तयार नाहीत. म्हणून गिरीष महाजन यांनी अखेर डॉक्टरांना इशारा दिला आहे. 

Loading Comments