मुंबईसह राज्यात मुलींच्या जन्मदरात घट

  Mumbai
  मुंबईसह राज्यात मुलींच्या जन्मदरात घट
  मुंबई  -  

  राज्यात मुलीच्या जन्मदरात घट झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या अहवालातून समोर आली आहे. आरोग्य विभागानं जाहीर केलेल्या नागरी नोंदणी अहवालानुसार 2015 साली महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर हजार मुलांमागे 907 मुलींचं होतं. मात्र 2016 या वर्षात या गुणोत्तरात जवळपास 8 टक्क्यांनी घट झाली आहे. 2016 मध्ये राज्यातील मुलींचा जन्मदर 899 इतका कमी झाला आहे. तसेच मुंबईसारख्या शहरातही लिंग गुणोत्तर 1 हजार पुरुषांमागे 936 स्त्रियांवर आल्याचं अहवालातून समोर आलं आहे. मुंबईत 2014 साली 1 हजार मुलांमागे 931 मुली असं लिंग गुणोत्तर होतं, जे 2015 मध्ये 1 हजार वरून 926 वर आलं आहे.

  राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये मुलींच्या जन्मदरात घट पाहायला मिळत आहे. यात वाशिम जिल्हा आघाडीवर असून वाशिममध्ये लिंग गुणोत्तरात 62 टक्क्यांची घट झाली आहे. वाशिम पाठोपाठ पुण्यासह उस्मानाबादमध्ये लिंग गुणोत्तरात घसरण झाली आहे. या जिल्ह्यांमध्ये 53 टक्क्यांनी मुलींचा जन्मदर घटल्याचं समोर आलं आहे. राज्यातील एकंदर लिंग गुणोत्तर घटलं असलं तरीही भंडारा जिल्ह्यात मुलींचा जन्मदर जवळपास 78 टक्क्यांनी वाढला आहे. भंडारा पाठोपाठ परभणी आणि लातूरमध्ये मुलींच्या जन्मदरात वाढ झाली आहे.

  राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये तसंच प्रमुख महानगरांमध्येही लिंग गुणोत्तरामध्ये घट झाल्याचं या अहवालात स्पष्ट झालं आहे. सर्वसाधारणपणे 1 हजार मुलांमागे 951 मुलींचं प्रमाण असणं गरजेचं आहे. हे प्रमाण कमी झाल्यास ती चिंतेची बाब समजली जाते.

  पुण्यामध्ये 2014 पर्यंत स्त्री-पुरुष जन्मदरात वाढ पाहायला मिळत होती. मात्र 2015 साली पुण्याचं लिंग गुणोत्तर 1 हजार होतं. ते आता 891वर आलं आहे. तर 2016 साली मुलींचा जन्मदर जवळपास 53 टक्क्यांनी घसरला. त्यामुळे पुण्याचं लिंग गुणोत्तर 1 हजारावरून थेट 838 वर आलं आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.