Advertisement

'रुग्णांची लूट थांबवा, तपासणी शुल्कावर नियंत्रण आणा'


'रुग्णांची लूट थांबवा, तपासणी शुल्कावर नियंत्रण आणा'
SHARES

डेंग्यू, स्वाईन फ्लू, मलेरिया अशा आजारांमध्ये रुग्णांच्या तपासण्या लवकर कराव्या लागतात. डेंग्यूच्या तपासणीसाठी 600 रुपये तर, स्वाईन फ्लूसाठी 3500 ते 4000 रुपये दरमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. पण, याच तपासण्यांसाठी खासगी प्रयोगशाळेत रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा रुपये घेतले जातात. या व्यतिरिक्त कोणत्या तपासणीसाठी किती शुल्क असावे? याचे दर खासगी प्रयोगशाळांसाठी निश्चित केलेले नाहीत. याच पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने खासगी प्रयोगशाळांतील तपासणींच्या शुल्कावर नियंत्रण आणावे, अशी ठरावाची सूचना महापालिकेच्या महासभेपुढे मांडण्यात आली. महापौरांनी याबाबत राज्य सरकारला विनंती करण्याची मागणी केली.


मुंबईकरांची लूट

वृद्ध रुग्णांच्या घरी जाऊन त्यांची तपासणी करण्यासाठी हेच शुल्क आणखी वाढवण्यात येते. त्यामुळे, मुंबईकरांना अशा खासगी प्रयोगशाळा लुटत आहेत, असा आरोप सभागृह नेते यशवंत जाधव यांनी केला. पालिका रुग्णालय आणि सरकारी प्रयोगशाळांमध्ये मर्यादित सुविधा आणि यंत्रणा असते. मात्र डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांमध्ये रुग्णाच्या प्लेटलेट्स झपाट्याने कमी झाल्यास ते रुग्णाच्या जीवावर बेतू शकते. त्यामुळे तातडीनं निदान करणाऱ्या खासगी प्रयोगशाळाच अशावेळी गरजू रुग्णांकरिता आधार ठरत असतात. पण, अशावेळी या प्रयोगशाळा जास्त पैसे आकारतात. या प्रयोगशाळांवर नियंत्रण आणणे राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे.


का करण्यात आली ठरावाची सूचना?

मुंबईमध्ये राहणाऱ्या सर्वच स्तरावरील लोकांची आर्थिकदृष्ट्या स्थिती वेगळी आहे. आरोग्य क्षेत्रातील सरकारी तोकड्या सेवा-सुविधा अथवा त्यासाठी लागणारा कालावधी लक्षात घेता रुग्ण आणि रुग्णांचे नातेवाईक साहजिकच खासगी आरोग्य सेवांचा लाभ घेतात. अशावेळी खासगी आरोग्य सेवांबाबत अव्वाच्या सव्वा दर आकारले जातात. त्यामुळे, आता ही लूट थांबवण्यासाठी राज्य सरकारने खासगी प्रयोगशाळांमधील तपासण्यांच्या शुल्कावर नियंत्रण आणावे, अशी ठरावाची सूचना पालिकेच्या महासभेपुढे मांडली.



हेही वाचा

'सरसकट वैद्यकीय उपकरणांचा औषधांमध्ये समावेश करा'


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा