Advertisement

कोविडसंबंधित सामग्रीवरील कर ५ टक्यांपर्यंत कमी

कोविडसंबंधित बहुतांश सामग्रीवरील कर ५ टक्यांपर्यंत कमी केल्याने कोरोनावरील उपचार स्वस्त होण्यास मदत होणार आहे.

कोविडसंबंधित सामग्रीवरील कर ५ टक्यांपर्यंत कमी
SHARES

कोरोना (coronavirus) उपचारासाठीची औषधे, लस, उपकरणे आदींवरील जीएसटी माफ किंवा कमी करण्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांचा सहभाग असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील मंत्रिगटाने केलेल्या शिफारशी ४४ व्या जीएसटी परिषदेने आज मान्य केल्या आहेत. शिफारशी मान्य झाल्याने ऑक्सिजन व संबंधित सामग्रीवर १२ ऐवजी आता ५ टक्के जीएसटी आकारला जाईल.

कोविडसंबंधित बहुतांश सामग्रीवरील कर ५ टक्यांपर्यंत कमी केल्याने कोरोनावरील उपचार स्वस्त होण्यास मदत होणार आहे. 

जीएसटी परिषदेची ४४ व्या बैठकीत या शिफारस अहवालाला मान्यता देण्यात आली. कोरोनाविरुद्धची लढाई सहज, सोपी, सुसह्य करण्यासाठी कोरोनावरील औषधे, लस, वैद्यकीय उपकरणे स्वस्त करण्याची, त्यावरील कर कमी किंवा माफ करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २८ मे रोजी झालेल्या ४३ व्या जीएसटी परिषदेत केली होती. 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मागणीची तातडीने दखल घेऊन केंद्रीय वित्त मंत्रालयाने दुसऱ्याच दिवशी मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ८ राज्यांच्या उपमुख्यमंत्री, वित्तमंत्र्यांचा मंत्रिगट स्थापन केला होता. या मंत्रिगटाने ८ दिवसात जीएसटी कमी करण्यासंदर्भातला शिफारस अहवाल केंद्राला सादर केला. त्यानंतर ४ दिवसात जीएसटी परिषदेची बैठक होऊन मंत्रिगटाने केलेल्या सर्व शिफारशी मान्य करण्यात आल्या. 

त्यानुसार वैद्यकीय ऑक्सिजन, आक्सिजननिर्मिती आणि संबंधित सामग्रीवर आता १२ टक्क्यांऐवजी ५ टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. मेडिकल ग्रेड ऑक्सिजन, वैयक्तिक उपयोगासह सर्व प्रकारचे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर-जनरेटर, व्हेंटिलेटर्स, व्हेंटिलेटर मास्क, कॅन्युला, हेल्मेट, बायपॅप मशिन, हाय फ्लो नॅसल कॅन्युला (एचएफएनसी) या साहित्यावर आतापर्यंत १२ टक्के जीएसटी होता, तो ५ टक्के झाला आहे.

हेही वाचा- नाल्याची सफाई न केल्यानं शिवसेनेकडून कंत्राटदारावर कचराफेक

कोविड चाचणी व संबंधित

कोविड (covid 19) चाचणी संच – १२ ऐवजी ५ टक्के, आरटीपीसीआर मशिन – १८ टक्के कायम, आरएनए एक्स्ट्रॅक्शन मशिन- १८ टक्के कायम, कोविड चाचणी संचासाठी आवश्यक सामग्री – प्रचलित दरानुसार, जिनोम सिक्वेन्सिंग किट – १२ टक्के कायम, जिनोम सिक्वेंन्सिंग मशिन- १८ टक्के कायम, स्पेसिफाईड इन्फ्लेमेटरी डायग्नॉसिस किट (डी-डिमर, आयएल-६ फेरिटीन आणि एलडीएच) – १८ ऐवजी ५ टक्के असे नवीन दर असतील.

कोविडसंबंधित अन्य सामग्री

वैयक्तिक उपयोगासाठी आयातीतसह सर्व पल्स ऑक्सिमिटर- १२ ऐवजी ५ टक्के, हॅन्ड सॅनिटायझर- १८ ऐवजी ५ टक्के, पीपीई किट- ५ टक्के कायम, एन ९५ – ५ टक्के कायम, ट्रिपल लेयर- ५ टक्के कायम, सर्जिकल मास्क- ५ टक्के कायम, टेम्परेचर चेक इक्विपमेंट- १८ ऐवजी ५ टक्के, रुग्णवाहिका- २८ ऐवजी १२ टक्के, पोर्टेबल हॉस्पिटल युनिट (फिरते दवाखाने) – १८ टक्के कायम, वीज आणि गॅसवर चालणारी शवदाहिनी- १८ ऐवजी ५ टक्के.

कोरोनावरील औषधे व लस

रेमिडिसिव्हिर- १२ ऐवजी ५ टक्के, टोसिलीझुमॅब- ५ ऐवजी ० टक्के, अॅम्फोटेरिसिन बी- ५ ऐवजी ० टक्के, अॅन्टी-कोअॅग्युलन्ट (हेपॅरिन व तत्सम) – १२ ऐवजी ५ टक्के, एमओएचएफडब्ल्यु आणि औषधविभागाने शिफारस केलेली अन्य औषधे – प्रचलित दराऐवजी ५ टक्के.

हेही वाचा- प्राप्तिकर विभागाचे नवीन ई-फाईलिंग पोर्टल सुरू, मिळतील 'हे' फायदे

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा