Advertisement

नाल्याची सफाई न केल्यानं शिवसेनेकडून कंत्राटदारावर कचराफेक

नालेसफाई झाल्याचा दावा महापालिकेनं आणि सत्ताधारी शिवसेनेनं केलेला असला तरी कुर्ल्यामध्ये शिवसेनेच्या आमदारांना मात्र नालेसफाई न झाल्याचा प्रत्यय आला आहे.

नाल्याची सफाई न केल्यानं शिवसेनेकडून कंत्राटदारावर कचराफेक
SHARES

नालेसफाई झाल्याचा दावा महापालिकेनं आणि सत्ताधारी शिवसेनेनं केलेला असला तरी कुर्ल्यामध्ये शिवसेनेच्या आमदारांना मात्र नालेसफाई न झाल्याचा प्रत्यय आला आहे. कुर्ल्यामध्ये संजय नगर नाल्यामध्ये गाळ साचून पाणी रस्त्यावर आल्यामुळं आमदारांनी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी कंत्राटदाराला कचऱ्यातच बसवल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. योग्य रित्या नाल्यांची सफाई न केल्यामुळं कुर्ल्यामध्ये पाणी साचल्यानं हा प्रकार घडला.

कंत्राटदाराच्या अंगावर नाल्यातील कचरा टाकल्यामुळे या कृत्याविषयी समाजमाध्यमावरून संताप व्यक्त होऊ लागला आहे. चांदिवली येथील शिवसेनेचे नगरसेवक व आमदार दिलीप लांडे हे कार्यकर्त्यांसह एका व्यक्तीला  नाल्याच्या बाजूला बसवून त्याच्यावर ओरडत असतानाची ध्वनिचित्रफीत रविवारी समाजमाध्यमावर फिरत होती. त्यांच्याबरोबरचे कार्यकर्ते या व्यक्तीच्या अंगावर डोक्यावर नाल्यातून काढलेला गाळ टाकताना दिसत होते.

दिलीप लांडे यांच्या मतदारसंघातील संजय नगर नाला गेल्या काही दिवसांपासून तुंबला होता. त्यामुळे शनिवारी सकाळपासूनच कंत्राटदाराला फोन करून हा नाला साफ करून देण्याबाबत सांगत होतो. पण तो दाद देत नव्हता.  नागरिकांना होणारा त्रास कळावा म्हणून हे पाऊल उचलावे लागल्याची माहिती दिलीप लांडे यांनी एका वृत्तवाहिनीला दिली आहे.

या व्हिडीओवरून भाजपच्या नगरसेवकांनी टीका के ली आहे. महापौर किशोरी पेडणेकर नालेसफाई झाल्याचे सांगतात. तर, दुसऱ्या बाजूला शिवसेना आमदार नाला साफ होत नाही म्हणून ठेकेदारावर गुंडगिरी करतात. हा प्रकार काँग्रेसला चालेल का असा टोला माजी खासदार किरीट सोमय्या यांनी लगावला. आमदारांविरोधात कारवाई करावी अशी मागणी भाजपचे पक्षनेते विनोद मिश्रा यांनी केली आहे.



हेही वाचा -

प्राप्तिकर विभागाचे नवीन ई-फाईलिंग पोर्टल सुरू, मिळतील 'हे' फायदे

फक्त गृहकर्जच नव्हे, तर पर्सनल लोनवरही मिळते कर सूट; हा आहे नियम

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा