Advertisement

जी. टी. रुग्णालयात लवकरच स्वतंत्र ‘पोडिअॅट्रिक’ विभाग


जी. टी. रुग्णालयात लवकरच स्वतंत्र ‘पोडिअॅट्रिक’ विभाग
SHARES

आपल्या शरीराचं वजन तोलून न थांबता चालणारी पावले जरा जास्तच दुर्लक्षित राहतात. त्यामुळेच भारतात २० टक्के लोकांना दिर्घकालीन पायांच्या आजारांमुळे पाय कायमचे गमवावे लागतात. याच पार्श्वभूमीवर, गोकुळदास तेजपाल म्हणजेच जी. टी. रुग्णालयात लवकरच 'पोडिअॅट्रिक’ विभाग सुरू करण्यात येणार आहे. या विभागाचा सर्वात जास्त फायदा मधुमेहाच्या रुग्णांना होणार आहे.


मधुमेहाचे ३० टक्के रुग्ण पायाच्या आजाराने त्रस्त

सध्या जी. टी. रुग्णालयात येणाऱ्या मधुमेहाने ग्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये ३० टक्क्यांहून जास्त रुग्णांना पायांचे आजार असतात. यावर प्रतिबंधात्मक आणि आधुनिक पद्धतीने उपचार सुरू व्हावेत यासाठी रुग्णालयात स्वतंत्र पोडिअॅट्रिक विभाग सुरू करण्याचा प्राथमिक प्रस्ताव असल्याचं जी. टी. रुग्णालयातील शल्यचिकित्सा विभागाच्या डॉ. विनया अंबारे यांनी सांगितलं.


कशी असणार नवी उपचार पद्धती?

सध्या पालिका आणि सरकारी रुग्णालयात मधुमेही रुग्णांच्या टणक झालेल्या पावलांची त्वचा मुळापासून काढली जाते. त्यामुळे रुग्णांना मोठी जखम होते. पण, नव्या तंत्रज्ञान आणि उपचार पद्धतीमुळे पावलांची त्वचा काढण्याची गरजच पडणार नाही. या उपचार पद्धतीत पावलांचा छोटासा भाग काढून जखम साफ करता येणार आहे.


स्वतंत्र पेडियाट्रिक विभाग सुरू झाल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांनाही कमी पैशांमध्ये चांगली सेवा मिळू शकते. या नव्या पद्धतीमुळे रुग्णांना जास्त जखम होणार नाही.

- डॉ. विनया अंबारे, शल्यचिकित्सा विभाग, जी.टी. रुग्णालय


कमी खर्रचात उपचार

जी. टी. रुग्णालयात सध्या १०० रुपये आणि शस्त्रक्रियेसाठी ५०० रुपये आकारले जातात. नवीन उपचारपद्धती सुरू झाल्यानंतरही सर्वसामान्य रुग्णांना अगदी कमी पैशात चांगली सेवा देता येऊ शकते. सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांनाही हे उपचार घेणे शक्य व्हावे यासाठी जी. टी. रुग्णालयात पोडिअॅट्रिक विभाग सुरू करण्यात येणार आहे. या विभागाच्या साहाय्याने अशा रुग्णांची नियमित रक्ततपासणी, पावलांची तपासणी, पावले टणक होण्यामागील कारणे यांचा अभ्यास केला जातो. त्यामुळे रुग्णांवरील उपचाराबरोबरच प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जातात. पावलांबरोबरच अनेकदा मधुमेहाच्या रुग्णांमध्ये नखांचा त्रासही संभवतो.

मुंबईतील पालिका किंवा सरकारी रुग्णालयात स्वतंत्र पोडिअॅट्रिक विभाग कार्यरत नाही. पण, अनेक खासगी रुग्णालयात मधुमेही रुग्णांमधील पावलासंबंधित आजारासाठी स्वतंत्र विभाग उघडण्यात आला आहे.

रुग्णांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी यासाठी जी. टी. रुग्णालय, ग्रॅण्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पोडिअॅट्रिक महाविद्यालय (जिनिव्हा) यांच्यातर्फे जी. टी. रुग्णालयात एक दिवसीय ‘फूटकॉन’ परिषदेचं आयोजन केले होते. या परिषदेत मधुमेही आणि इतर रुग्णांमधील पावलांच्या आजारावरील उपचारपद्धतीबाबत चर्चा करण्यात आली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा