Advertisement

H3N2 Outbreak : मास्क पुन्हा वापरावा लागणार, जाणून घ्या सरकारचे नवे आदेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज तात्काळ संसर्गजन्य H3N2 ची आढावा बैठक घेतली. यानंतर राज्य सरकारने नवे आदेश जारी केले आहेत.

H3N2 Outbreak : मास्क पुन्हा वापरावा लागणार, जाणून घ्या सरकारचे नवे आदेश
SHARES

महाराष्ट्रात कोरोनाच्या भीतीनंतर आता H3N2 व्हायरसच्या संसर्गाने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. मागील तीन दिवसांत राज्यात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज तात्काळ संसर्गजन्य H3N2 ची आढावा बैठक घेतली. यानंतर राज्य सरकारने नवे आदेश जारी केले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज H3N2 संसर्गाबाबत बैठक बोलावली होती. या बैठकीला आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत कोविड १९ व H3N2 हे दोन्ही संसर्गाच्या उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.

कोरोना आणि एच३एन२ या व्हायरसच्या प्रसाराची कारणेही सारखी आहेत. त्यामुळेच कोविड काळात उभी करण्यात आलेली यंत्रणा ही पुन्हा अॅक्टीव्ह करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांनी दिलेले आदेश खालीलप्रमाणे

  • गरोदर महिला, लहान मुलं, वृद्ध आणि आजारी नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावे.
  • सर्दी खोकला यासारखी लक्षणं आढळल्यास डॉक्टरांच्या सल्यानुसार औषध घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी शक्यतो मास्क वापरावा.

पिंपरी चिंचवडमध्ये H3N2 विषाणुमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यातील हा तिसरा बळी आहे. यापूर्वी अहमदनगर आणि नागपूरमध्ये या व्हायरसने बाधित दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आता राज्यातील H3N2 बाधित रुग्णाच्या मृत्यूची संख्या तीनवर पोहोचली आहे. अहमदनगरमधील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा रुग्ण मेडिकल कॉलेजचा २३ वर्षीय विद्यार्थी होता.



हेही वाचा

मुंबईत H3N2 चा उद्रेक, कोविडपेक्षा इन्फ्लूएंझा प्रकरणे जास्त

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा