344 मिश्र औषधांवरील बंदी उठली

  Pali Hill
  344 मिश्र औषधांवरील बंदी उठली
  मुंबई  -  

  मुंबई - दिल्ली उच्च न्यायालयाने 344 मिश्र (दोन-तीन औषधे एकत्रित करुन तयार केलेले एक औषध) औषधांवरील बंदी मागे घेतलीय. केंद्र सरकाने मार्च 2016 मध्ये या औषधांमुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याचं स्पष्ट करत 344 औषधांवर बंदी घातली होती. तर ही औषधे त्वरीत बाजारातून नष्ट करण्याचे आदेश देशभरातील एफडीएला दिले होते. त्यानुसार ही औषधं बाजारात सध्या उपलब्ध नाहीत. यात विक्स अॅक्शन 500 एक्स्ट्रा, डी-कोल्ड, कोरेक्स कफ सिरप अशा ब्रॅन्डेड औषधांचा समावेश होता.

  या बंदीविरोधात 454 कंपन्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार आता बंदी उठवल्याने ही औषधं लवकरच बाजारात उपलब्ध होतील असं म्हटले जात आहे.
  मिश्र औषधांमुळे आरोग्यावर परिणाम होतात हे अनेकदा सिद्ध झाले आहे. परदेशामध्ये मिश्र औषधांवर बंदी आहे. त्यामुळे मिश्र औषधांवर बदी आवश्यक असल्याचे मत यानिमित्ताने वैद्यकिय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे केंद्रानं आता आपण न्यायालयात बाजू मांडण्यात नेमके कुठे कमी पडलो याचा विचार करत सर्वोच्च न्यायालयात याला आव्हान द्यावे, असं मतही तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.