'महिलांनी आरोग्य जपायला हवं'


  • 'महिलांनी आरोग्य जपायला हवं'
SHARE

भायखळा - येथील महानगरपालिका शाळेत मंगळवारी दुपारी 'साई' संस्थेच्या वतीनं जागतिक महिलादिनानिमित्त देहविक्री करणाऱ्या महिलांना आरोग्याविषयी माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाला आरोग्य तज्ञ निवेदी चव्हाण, शीतल हर्णेकर यांची उपस्थिती होती. तर प्रमुख पाहुण्या म्हणून आरोग्य तज्ञ शालिनी शर्मा यांनी महिलांना मार्गदर्शन केले. निवेदी चव्हाण, शीतल हर्णेकर यांनी रोजच्या जेवणात कोणते पदार्थ असावेत यासंबधित माहिती दिली. 

तर शालिनी शर्मा यांनी त्या महिलांना योगा, ध्यानधारणा आणि फिटनेस या संबधित माहिती दिली. तर त्यांच्याकडून योगासनांचे प्रात्यक्षिक करून घेतले. साई संस्था गेली 25 वर्ष देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी काम करत आहे. संस्थेच्या वतीनं देहविक्री करणाऱ्या स्त्रियांसाठी वेगवेगळे कार्यक्रम राबवले जातात.

संबंधित विषय
ताज्या बातम्या