आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

 Ghatkopar
आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
See all

घाटकोपर – रमाबाई कॉलनी येथील गंधकुटी विहारात आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं. शिबीर वंदना कॅन्सर ट्रस्ट आणि भाजपा यांच्या संयुक्त विद्यमानं सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू होतं. यात ताप, सर्दी, खोकला, उलटी, डोके दुखणे, अशक्तपणा, पाठ, कंबर, हात, पाय, गुडघे या सर्व त्रासांवर मोफत औषध वाटप करण्यात आलं. तसेच ईसीजी एन्जोग्राफी, बायपास सर्जरी, किडनी स्टोन, किडनीचे आजार, पोटांचे विकार आणि कॅन्सरचे विविध प्रकार-सर्जरी या आजाराच्या तपासणीसाठी १० रुपये नोंदणी फी घेण्यात आली.

Loading Comments