• चेंबूरमध्ये मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन
  • चेंबूरमध्ये मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन
SHARE

चेंबूर : कामावाडी परिसरात मंगळवारी नवतरुण मित्र मंडळाने रोटरी क्लब आणि साईराज फाउंडेशन यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं. सकाळी 9 वा. सुरू झालेलं हे आरोग्य शिबीर 4 वाजेपर्यंत सुरू होतं. या आरोग्य शिबिरात चेंबूर येथील कामावाडी परिसरातील 200 पेक्षा अधिक जणांनी भाग घेतला होता. यात कान-नाक-घसा तपासणी, कॅन्सर चेकअप, टी.बी. चेकअप, स्त्रीरोग तपासणी, रक्त तपासणी आदी तपासणी करण्यात आल्या. मिळालेल्या प्रतिसादामुळे नवतरुण मित्र मंडळाचे कार्यकर्ते सत्यवान पाटील, हेमंत गुजराथी, धनेश चव्हाण, स्वप्नील डांगे आणि लोकेश गौडा यांनी समाधान व्यक्त केलं. यासारखेच सामाजिक कार्यक्रम यापुढेही परिसरात करणार असल्याची ग्वाही त्यांनी या वेळी दिली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या